नाशिक

डॉ. कलाम जयंतीनिमित्त वृत्तपत्र विक्रेत्यांचा सन्मान

CD
NSK26H32574 जळगाव : डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त शहरातील वृत्तपत्र विक्रेत्यांचा गुरुवारी सत्कार करण्यात आला. कलामांच्या प्रतिमेला अभिवादनही करण्यात आले, त्याप्रसंगी उपस्थित वृत्तपत्र विक्रेते. -------- डॉ. कलाम जयंतीनिमित्त वृत्तपत्र विक्रेत्यांचा सन्मान सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १५ : ऊन, पाऊस असो वा कडाक्याची थंडी, कोणत्याही परिस्थितीत वाचकांच्या दारापर्यंत बातम्या पोहोचविणाऱ्या वृत्तपत्र विक्रेत्यांच्या कष्टांना सलाम करण्याचा दिवस म्हणजे १५ ऑक्टोबर.. वृत्तपत्र विक्रेता दिन. भारताचे माजी राष्ट्रपती आणि थोर शास्त्रज्ञ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी वृत्तपत्र विक्रेता दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त वृत्तपत्र विक्रेत्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले, तर मिष्ठान्नाचे वितरण करून त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. बातम्या पोहोचविणारे हातही कौतुकास पात्र वृत्तपत्र विक्रेता हा केवळ वृत्तपत्र पोहोचविणारा घटक नसून, तो वाचक आणि बातम्या यांच्यातील महत्त्वाचा दुवा आहे. त्याच्या मेहनतीमुळेच माहितीचा प्रवाह प्रत्येक घरापर्यंत पोहोचतो. त्यामुळे त्याच्या श्रमांचा सन्मान केवळ एका दिवसापुरता मर्यादित न राहता त्याला सामाजिक आणि आर्थिक सुरक्षितताही मिळणे आवश्यक आहे. त्यांच्या अडचणी समजून घेऊन कल्याणकारी योजना आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी अपेक्षा वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष प्रा. नितीन चौधरी यांनी व्यक्त केली उपाध्यक्ष विशाल वाणी व संजय चौधरी, सचिव बबन कोतकर, अर्जुन पाटील ,ज्येष्ठ सल्लागार रवी जोशी, विलास वाणी, वसंत गायकवाड, गोपाल चौधरी, भालचंद्र वाणी, राकेश सोनार, किशोर साळुंखे, हिरालाल टेकावडे, तुषार चौधरी, हरीश चौधरी, महेश सोनार, दिनेश वाणी, अरुण बारी, धिरज काळुंखे यांनी व्यक्त केली. ------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

cctv video: जामनेर तालुक्यात भीषण अपघात! एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू, ट्रक चालक ताब्यात

FDA Blood Donation Rules : रक्तदान शिबिरांबाबत आयुक्त तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय!

IND vs NZ: बुमराह नसेल, तर त्याच्या जागी न्यूझीलंडविरुद्ध ODI मालिकेत कोणाची वर्णी लागणार? शमीसह तीन खेळाडूंचे पर्याय

Manoj Jarange On Farmer Relief : "५ हजारांसाठी शेतकऱ्यांनी बँकेच्या रांगेत मरायचं का?"; मनोज जरांगेंचा सरकारवर थेट हल्लाबोल, म्हणाले...

Latest Marathi News Update: कोथरुडमध्ये मद्यधुंद तरुणाची बेदरकारपणे ड्रायव्हिंग

SCROLL FOR NEXT