SNR23107
सिन्नर ः ‘सकाळ’तर्फे येथे गुरूवारी वृत्तपत्र विक्रेत्यांचा गौरव करण्यात आला. त्याप्रसंगी उपस्थित राजेंद्र जाजू, दत्ता वायचळे, गणेश पगार यांच्यासह वृत्तपत्र विक्रेते.
--------------------
‘सकाळ’तर्फे सिन्नर येथे
वृत्तपत्र विक्रेत्यांचा सत्कार
-------------
सकाळ वृत्तसेवा
सिन्नर, ता.१५ ः येथे जागतिक वृत्तपत्र विक्रेता दिन साजरा करण्यात आला. बसस्थानकावर पहाटेपासून घरोघरी वृत्तपत्र पोहोचविणाऱ्या वृत्तपत्र विक्रेत्यांचा ‘सकाळ’तर्फे सन्मान करण्यात आला. वाचकांपर्यंत दररोज वेळेवर पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करणाऱ्या विक्रेत्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
‘सकाळ’चे वितरक राजेंद्र जाजू, सामाजिक कार्यकर्ते दत्ता वायचळे, ‘सकाळ’चे वितरण प्रतिनिधी गणेश पगार यांच्या हस्ते वृत्तपत्र विक्रेत्यांचा सत्कार करण्यात आला. सुरुवातीला भारतरत्न डॉ. ए. पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. वृत्तपत्र विक्रेते प्रवीण आव्हाड, अशोक उकाडे, कैलास सांगळे, कुणाल भोई, किशोर भोई, पिंटू दळवी, गोरख सोनवणे, संजय काळे, भास्कर काळे, सुरेश कपिले, विनायक मुळे आदी उपस्थित होते. विक्रेत्यांना गुलाबपुष्प, मिठाई, पेन देऊन वृत्तपत्र विक्रेता दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. वृत्तपत्र विक्रेते हे वृत्तपत्र आणि वाचक यांच्यातील महत्त्वाचा दुवा असून, त्यांच्या मेहनतीमुळेच दररोज सकाळी वृत्तपत्र वाचकांच्या घरापर्यंत पोहोचते. वाचन संस्कृती टिकवून ठेवण्यात वृत्तपत्र विक्रेत्यांचे योगदान मोलाचे असल्याचे सांगण्यात आले.
-----------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.