नाशिक

निदा खान घटस्फोट सुनावणी पुढे ढकळली, २० नोव्हेंबरला होणार सुनावणी

CD
निदा खान घटस्फोट सुनावणी २० नोव्हेंबरला सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १६ : राज्यभर गाजलेल्या टीसीएस प्रकरणातील संशयित निदा खान हिचा पती मोईन नाविद खान याने कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. यात शुक्रवारी (ता. १६) नाशिक रोड येथील कौटुंबिक न्यायालयात पहिल्या सुनावणीनिमित्त समुपदेशनाची प्रक्रिया पार पडली. समुपदेशनानंतरही मोईन घटस्फोट घेण्याच्या निर्णयावर ठाम असल्याने पुढील सुनावणी २० नोव्हेंबरला होणार आहे. टीसीएस कथित धर्मांतर प्रकरणात निदा खानचे नाव संशयित म्हणून समोर आले आहे. त्यामुळे तिचा वैवाहिक जीवनातील वादही न्यायालयापर्यंत पोहोचल्याने तिच्या अडचणीत वाढ झाली. मोईन खान याने घटस्फोटासाठी कौटुंबिक न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. न्यायालयाच्या सूचनेनुसार शुक्रवारी दोघांचे समुपदेशन करण्यात आले. या वेळी पती-पत्नी दोघेही उपस्थित होते. समुपदेशनादरम्यान मोईन हा व्यक्त केलेल्या भावनेवर ठाम राहिला. या प्रकरणामुळे कुटुंबाला प्रतिकूल अनुभवांना सामोरे जावे लागले. मानसिक त्रासासह समाजात वावरतानाही अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे त्याने न्यायालयात सांगितले. पहिल्या समुपदेशनानंतर न्यायालयाने दोन्ही बाजूंना विचार करण्यासाठी वेळ दिला आहे. तथापि, मोईन याने घटस्फोट घेण्याच्या निर्णयावर ठाम असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे घटस्फोट अर्जावर आता २० नोव्हेंबरला पुढील सुनावणी होणार आहे. अर्जदार मोईन खान याच्यातर्फे ॲड. नितीन पंडित, तर प्रतिवादी निदा खान हिच्यातर्फे ॲड. शोभा ताजनपुरे यांनी बाजू मांडली.

IND W VS ZIM W: संकटमोचक बनून आली दीप्ती शर्मा! झिम्बाब्वेविरुद्ध २७ धावांत ४ विकेट्स गमावल्यानंतरही भारताचा थरारक विजय

Bombay High Court Decision : महाराष्ट्रात दिवाळीत फटाके फोडण्यावर निर्बंध; मुंबई उच्च न्यायालयाचा अत्यंत मोठा आणि महत्त्वपूर्ण निर्णय!

Delhi Protest High Voltage : "ज्ञानेश कुमारांना भारतरत्न द्या!"; सीजेपीच्या 'तिरंगा यात्रे'दरम्यान अभिजीत दिपकेंविरोधात घोषणाबाजी, 'मोदी-मोदी'च्या नाऱ्यांनी दणाणला परिसर

Albatya Galbatya 2.0 Drama : ‘अलबत्या गलबत्या’ने रचला इतिहास; सलग सात प्रयोगांचा ‘शिखर विश्वविक्रम’

Badnapur Drought : ‘पाच हजारांत दिवाळी कशी साजरी करायची? दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचा आर्त सवाल; रामदास आठवले यांच्यासमोर शेतकऱ्यांनी मांडल्या व्यथा

SCROLL FOR NEXT