Nashik Municipal Commissioner Ramesh Pawar Latest Marathi News esakal
नाशिक

NMC Election | अन्यथा निलंबनानंतर गुन्हे दाखल करणार : आयुक्त रमेश पवार

विक्रांत मते

नाशिक : महापालिका निवडणुकीसाठी (NMC election) जाहीर आलेल्या प्रारूप मतदार याद्यांवर (Draft Voter List) विक्रमी हरकती आल्यानंतर आयुक्त रमेश पवार (NMC commissioner) यांनी स्वतः स्थळ पाहणी केली असताना कर्मचाऱ्यांकडून चुका झाल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. परंतु, कर्मचाऱ्यांच्या नशिबाने १६ जुलैपर्यंत अंतिम याद्या प्रसिद्ध करण्यासाठी मुदतवाढ मिळाली आहे. त्या कालावधीत मतदार याद्यांमधील चुका दुरुस्त कराव्या अन्यथा निलंबनानंतर गुन्हेदेखील दाखल केले जाणार आहे. (NMC Commissioner Ramesh Pawar warning on bogus voter list NMC election Nashik News)

२३ जूनला प्रारूप मतदार याद्या विभागनिहाय प्रसिद्ध करण्यात आल्यानंतर त्यावर ३ जुलैपर्यंत हरकतीसाठी मुदत देण्यात आली होती. हरकतींच्या कालावधीमध्ये तीन हजार ८४७ हरकती प्राप्त झाल्या. महापालिकेच्या आतापर्यंतच्या इतिहासात सर्वप्रथम एवढ्या मोठ्या प्रमाणात हरकती प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे आयुक्त पवार हे स्वतः हरकतींची छाननी करण्यासाठी मैदानात उतरले आहेत. प्रारूप मतदार याद्यांची पाहणी करताना हरकतींमध्ये तथ्य आढळल्याचे निदर्शनास आल्याचे आयुक्त पवार यांनी सांगितले.

प्रभागांच्या हद्दीवरील नावे अन्य प्रभागात टाकण्यात आले आहेत. आता निवडणूक आयोगाने अंतिम याद्या प्रसिद्धीची तारीख १६ जुलैपर्यंत वाढविल्याने कर्मचाऱ्यांना चुका दुरुस्त करण्याची संधी आहे. चुका दुरुस्त न झाल्यास निलंबनानंतर गुन्हेदेखील दाखल करण्याच्या सूचना दिल्या आहेत. कर्मचाऱ्यांना कारवाईचा इशारा देताना आयुक्त पवार यांनी चुकीच्या हरकती दाखल करणाऱ्यांच्या तक्रारी राज्य निवडणूक आयोगाला कळविण्याचा निर्णय घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandharpur Ashadhi Ekadashi : "बा विठ्ठला, राज्यातील प्रत्येक शेतकरी सुखी राहू दे..."; शासकीय महापूजेनंतर CM फडणवीसांचे पांडुरंगाला साकडे

Ashadhi Ekadashi Mahapuja : '20 वर्षे एकही वारी चुकवली नाही...'; मुख्यमंत्री फडणवीसांसोबत शासकीय महापूजेचा कोणाला मिळाला मान? धाराशिवमधील शेतकरी दाम्पत्य आहे तरी कोण?

Pandharpur Ashadhi Ekadashi Live Updates : CM देवेंद्र-अमृता फडणवीसांच्या हस्ते विठूरायाची महापूजा; मुख्यमंत्र्यांनी काय मागितलं मागणं?

Pandharpur Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न; धाराशिवच्या शेतकरी दाम्पत्याला मिळाला 'मानाचा वारकरी' होण्याचा बहुमान

Pandharpur Ashadhi Wari : पंढरपुरात वैष्णवांचा मेळा! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पहाटे पार पडणार शासकीय महापूजा, 20 लाख भाविक दाखल

SCROLL FOR NEXT