NMC Nashik news esakal
नाशिक

Climate Control Action Plan तयार करण्याचा NMCचा निर्णय

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : शहरांमध्ये जल, वायू व जमिनीचे प्रदूषण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने क्लायमेट कंट्रोल ऍक्शन प्लॅन तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी वर्ल्ड रिसोर्स इन्स्टिट्यूट या संस्थेची नियुक्ती केली आहे. डिसेंबरअखेरपर्यंत हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी काय उपाययोजना करायच्या, या संदर्भात आराखडा सादर केला जाणार आहे. (NMC decision to prepare Climate Control Action Plan Nashik latest marathi news)

२०५० पर्यंत नेट झिरो उत्सर्जन मोहीम साध्य करण्यासाठी केंद्र सरकारने देशभरात उपक्रम हाती घेतला आहे. त्या अंतर्गत राज्यातील ४३ शहरांची निवड करण्यात आली आहे. या ४३ शहरांमध्ये नाशिकचा समावेश केला आहे. नाशिक महापालिकेकडून वातावरण बदल कृती आराखडा अर्थात क्लायमेट कंट्रोल ऍक्शन प्लॅन तयार करण्यासाठी वर्ल्ड रिसोर्स इन्स्टिट्यूट संस्थेची नियुक्ती केली आहे.

संस्थेकडून शहरात काम सुरू केले आहे. वातावरणात बदल होत असताना या बदलाचा काय परिणाम होईल हवा व उष्णतेबाबत काय चित्र असेल, पायाभूत सुविधांवर याचा काय परिणाम होईल, वाहतूक निवासी व अनिवासी इमारतीमधील ऊर्जा वापर व घनकचरा उत्सर्जनातील प्रमुख क्षेत्राचे योगदान, यावर अभ्यास केला जाणार आहे. कृती आराखड्यात उपाययोजना सुचविल्या जाणार आहे.

जागतिक संघटनेकडून अर्थसाह्य

वातावरण बदलांना सामोरे जाताना त्यासाठी कृती आराखडा तयार केला जाणार आहे. कृती आराखडा तयार करण्यासाठी जागतिक संघटनेकडून अर्थसाहाय्य उपलब्ध करून दिले जाणार आहे.

पुढील वर्षांपासून नेट झिरो कार्बन उद्दिष्ट गाठण्यासाठी अंमलबजावणी केली जाणार आहे. तापमान हवेचे प्रदूषण व पूर या आपत्तीचे विश्लेषण आराखड्यात केले जाणार आहे. डिसेंबरअखेर महापालिकेला अहवाल सादर झाल्यानंतर जानेवारी २०२३ पासून उपाययोजना केल्या जाणार आहेत..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT