Womens nmc Election reservation draw esakal
नाशिक

नाशिक : साडेआठ हजार नाशिककरांचा ऑनलाइन आरक्षण सोडतीला प्रतिसाद

विनोद बेदरकर

नाशिक : महापालिका निवडणुकांसाठी (NMC elections) मंगळवारी (ता.३१) महिला आरक्षणाची सोडत (women reservation draw) झाली. कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहात झालेल्या आरक्षण सोडतीसाठी सभागृहात जेमतेम प्रतिसाद होता. तर, सोशल मिडियावर (Social media) साडेआठ हजाराहून अधिक नागरिकांनी सोडत अनुभवली. (NMC election womens online reservation draw Nashik News)

महापालिकेने महिला आरक्षणाची सोडत पहाण्यासाठी नाशिककर नागरिकांना महापालिकेच्या संकेतस्थळावर, फेसबुकवर माय नाशिक पेजवर, तसेच व्हिडिओ लिंकवर ऑनलाइन पाहण्याची सोय केली होती.

अनुसूचित जाती, जमाती आणि सर्वसाधारण गटातील महिलांच्या पन्नास टक्के जागांसाठी सोडत काढण्यात आली. दादासाहेब गायकवाड सभागृहात सकाळी साडे नऊपासून अनेक इच्छुक तसेच पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. याशिवाय नागरिकांची गर्दी होऊ नये त्यांना घरबसल्या सोडत पाहायला मिळावी म्हणून महापालिकेने सोशल मिडियावर सोय केली होती. महापालिकेतर्फे अनुसूचित जाती, जमाती महिला व सर्वसाधारण महिला गटाचे आरक्षण निश्चित करण्याच्या सोडतीचे मंगळवारी (ता. ३१) सकाळी दहाला ऑनलाइन प्रसारण सुरू झाले. त्यात https://fb.me/e/6xjFDs7fl या फेसबुक (Facebook) लिंकवर, तसेच https://youtube.com/c/mynmc या यू ट्यूब (Youtube) लिंकवर थेट प्रसारणाची सोय केली होती. आरक्षण सोडत दरम्यान ७ हजार ७०० नागरिकांनी फेसबुकवर हजेरी लावली, तर यू ट्युब लिंकवर ७९० नागरिकांनी महापालिकेचे आरक्षण प्रक्रियेचा घरबसल्या आनंद घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold-Silver Rate Today: सोनं-चांदीच्या भावात मोठी घसरण! 11 सप्टेंबरला पुन्हा दर कोसळणार? जाणून घ्या ताजी अपडेट

‘त्याला माझी इनसिक्युरिटी वाटायची’; अनेक वर्षांनंतर नीना गुप्तांनी उघड केलं गुपित, म्हणाल्या...'माझ्यापेक्षा जास्त...'

ChatGPT's 80s Photo Trend: Instagram वर व्हायरल होतोय 'ChatGPT ’80s Photo Trend'; 'हा' सोपा प्रॉम्प्ट वापरून तयार करा तुमचा ८० च्या दशकातील रेट्रो लूक!

Marathi News Live Updates : लातूर जिल्ह्यात कोरडा दुष्काळ; शेतकऱ्यांच्या स्वप्नांची माती, मायबाप सरकारला आर्त हाक

Share Market Today: इराणच्या अमेरिकेला धमकीने शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्स 500 अंकांनी खाली; कोणत्या शेअर्सला मोठा फटका?

SCROLL FOR NEXT