नाशिक

वर्धापन दिनाचा खर्च टाळून १० विद्यार्थी दत्तक

CD
लोगो : प्रेरणादायी (टुडे ४, ॲन्कर) ------- वर्धापन दिनाचा खर्च टाळून १० विद्यार्थी दत्तक उपशीर्षक नोबेल फाउंडेशनचा उपक्रम; शैक्षणिक खर्च उचलणार सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १६ : महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर वर्धापन दिनानिमित्त होणारे विविध कार्यक्रम आणि जाहिरातींवरील अनावश्यक खर्च टाळून दुष्काळग्रस्त परिस्थितीतील दहा गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दत्तक घेण्याचा निर्णय फाउंडेशनने घेतला आहे. या विद्यार्थ्यांना मोफत निवास व भोजनाची सुविधा देण्यासोबतच त्यांच्या शिक्षणासाठी आवश्यक ते सहकार्य करण्यात येणार आहे. नोबेल फाउंडेशनचा अकरावा वर्धापन दिन १५ ऑक्टोबरला साजरा करण्यात आला. गेल्या अकरा वर्षांपासून शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात सातत्याने कार्यरत असलेल्या फाउंडेशनने यंदा उत्सवापेक्षा सामाजिक उत्तरदायित्वाला प्राधान्य देत समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. वर्धापन दिनानिमित्त मोठा कार्यक्रम आयोजित करणे किंवा जाहिरातींवर खर्च करण्याऐवजी तोच निधी गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी वापरण्याचा निर्णय नोबेल फाउंडेशनने घेतला आहे. दुष्काळामुळे शेतकरी, शेतमजूर आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांपुढे निर्माण होणाऱ्या अडचणी लक्षात घेता, अशा कुटुंबांतील विद्यार्थ्यांचे शिक्षण आर्थिक परिस्थितीमुळे थांबू नये, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे. या निर्णयानुसार दहा गरजू विद्यार्थ्यांना निवासी सुविधेसह मोफत भोजन उपलब्ध करून देण्यात येणार असून, त्यांच्या शिक्षणासाठीही विनामूल्य सहकार्य केले जाणार आहे. आर्थिक अडचणींमुळे गुणवंत विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागू नये, यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे. --------- कोट सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत शेतकरी आणि शेतमजुरांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे ही काळाची गरज आहे. समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मदतीचा हात देण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेणे आवश्यक आहे. - जयदीप पाटील --------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND W vs ZIM W: नव्या पर्वाची सुरुवात पण स्मृती मंधाना आणि झिम्बाब्वेच्या खेळाडू हाताला काळी पट्टी बांधून मैदानावर का उतरले? नेमकं काय घडलं?"

Raju Shetty : केंद्र सरकारचे नाक दाबण्यासाठी साखर उत्पादन बंद करा; राजू शेट्टी यांचे आवाहन

Elon Musk: ''मी कोणत्याही गोऱ्या व्यक्तीला देशाच्या निर्णयात हस्तक्षेप करू देणार नाही''; इलॉन मस्क वादावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले?

Delhi Protest High Drama : 'तिरंगा मार्च' सुरू होण्यापूर्वी अवघ्या १० मिनिटे आधी मोठी कारवाई! सीजेपी प्रमुख अभिजीत दिपकेंना दिल्ली पोलिसांकडून पुन्हा ताब्यात

Marathi News Live Updates: MPSC पेपरफुटी चौकशी समितीची घोषणा, पण तुकाराम मुंढेंना अद्याप लेखी आदेशच नाही

SCROLL FOR NEXT