Chhagan Bhujbal esakal
नाशिक

वाचकांच्या आवडीनिवडी लक्षात घ्या : छगन भुजबळ

तुषार महाले

नाशिक : उत्तम पुस्तके वाचनालयाच्या कपाटात न राहता ती वाचकांपर्यंत पोचली पाहिजेत. वाचकांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन त्याच्यापर्यंत पुस्तके घेऊन गेल्यास वाचन संस्कृती वाढीला लागेल, असे मत पालकमंत्री तथा मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मांडले. विश्वास ज्ञानप्रबोधिनी आणि यशवंतराव चव्हाण वाचनालयाच्या ‘माय बुक बास्केट’ या उपक्रमाला त्यांनी २५ पुस्तके भेट दिली. या वेळी ते बोलत होते.

ग्रंथ हातात घेऊन वाचणारे वाचक कायम

छगन भुजबळ म्हणाले, की तंत्रज्ञानाने रंजनाची साधने आपल्या हातात आली आहेत. तरीसुद्धा ग्रंथ हातात घेऊन वाचणारे वाचक आहेत. त्यांच्या वाचनाच्या आवडीनिवडी आहेत. ग्रंथ तुमच्या दारी योजनेचे पुढचे पाऊल असलेल्या ‘माय बुक बास्केट’ या उपक्रमातून वाचकांना त्यांच्या आवडीचे साहित्य वाचायला मिळणार आहे. त्यामुळे हा उपक्रम ज्ञानसंवर्धन आणि वाचन अभिरुची वाढवणारा उपक्रम ठरेल, असे त्यांनी नमूद केले.

या वेळी विश्वास ठाकूर, विनायक रानडे यांनी उपक्रमाची माहिती दिली. याप्रसंगी जयप्रकाश जातेगावकर, दिलीप साळवेकर, प्रा. डॉ. शंकर बोऱ्हाडे, संजय करंजकर, अमोल जोशी आदी उपस्थित होते. ३ ते ५ डिसेंबर या कालावधीत नाशिकमध्ये होणाऱ्या साहित्य संमेलनात माय बुक बास्केट या उपक्रमाची माहिती विश्वास ज्ञान प्रबोधिनी आणि यशवंतराव चव्हाण वाचनालयाकडून वाचकांपर्यंत मोठ्या प्रमाणात पोचविण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking : IPL 2026 च्या वेळापत्रकात बदल, चेन्नई सुपर किंग्स अन् गुजरात टायटन्सच्या चाहत्यांसाठी महत्त्वाची बातमी... कारण काय?

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाचा निर्णय! महायुती सरकारचे तब्बल ₹१२,२४० कोटी रुपये वाचणार; योजनेत मोठा टर्निंग पॉइंट

Ahilyanagar Development: अहिल्यानगर करायचे महेश्‍वर! केंद्राकडे निधीची मागणी, पालकमंत्र्यांच्या सूचनेप्रमाणे शहर विकासासाठी २००० कोटींचा प्रस्‍ताव..

Pune Bhavani Peth Crime News: भवानी पेठेत पूर्ववैमनस्यातून १८ वर्षीय तरुणाचा खून; खडक पोलिसांकडून चौघांना अटक

भाई, हा तर हार्दिक पांड्याची पोल खोलतोय! R Ashwin नं नाव न घेता Mumbai Indians च्या कर्णधाराला धुतले, Video Viral

SCROLL FOR NEXT