Police Bribe Crime esakal
नाशिक

Nashik Bribe Crime: ट्रक सोडण्यासाठी एक लाखाच्या लाचेची मागणी; पोलीस हवालदारासह एकास अटक

सकाळ वृत्तसेवा

Nashik Bribe Crime : नाशिक तालुका पोलीस ठाण्यांंतर्गंत विल्होळी पोलीस चौकी येथे जमा केलेला ट्रक सोडण्यासाठी पोलीस हवालदाराने एक लाखांच्या लाचेची मागणी केली.

तडजोडीअंती ३५ हजार रुपयांची लाच खासगी इसमाने हिरावाडीत (पंचवटी) स्वीकारली. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोघांना अटक केली आहे. (One lakh bribe demanded to release truck One arrested along with police constable Nashik Bribe Crime)

रवींद्र बाळासाहेब मल्ले या पोलीस हवालदारासह खासगी इसम तरुण मोहन तोंडी असे अटक करण्यात आलेल्या दोघा लाचखोरांची नावे आहेत. नाशिक तालुका पोलीस ठाण्याअंतर्गत विल्होळी पोलीस चौकी येथे लाचखोर पोलीस हवालदार मल्ले यांची नेमणूक होती.

तक्रारदाराच्या तक्रारीनुसार विल्होळी पोलीस चौकी येथे त्यांचा ट्रक जमा होता. तो ट्रक सोडण्यासाठी लाचखोर हवालदार मल्ले याने तक्रारदाराकडे १ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती ७० हजार रुपये देण्याचे ठरले होते. यासंदर्भात तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.

लाचेचा पहिले ३५ हजार रुपयांची रक्कम देण्यासाठी लाचखोर मल्ले याने तक्रारदारास खासगी इसमाकडे पाठविले. त्यानुसार पंचवटीतील हिरावाडीत असलेल्या ओम नागपूर ट्रान्सपोर्ट येथे तक्रारदाराकडून लाचेची ३५ हजारांची रक्कम तरुण तोडी याने स्वीकारली.

त्यावेळी सापळा रचून दबा धरून असलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने तोडी यास अटक केली. त्याचवेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या दुसऱ्या पथकाने लाचखोर पोलीस हवालदार रवींद्र मल्ले यास विल्होळी पोलीस चौकी येथे अटक केली.

दोघांविरोधात पंचवटी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कामगिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अपर अधीक्षक माधव रेड्डी, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी बजावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: जरांगेंचं उपोषण सुरु असताना नाशिकमध्ये मराठा समन्वयकांची पत्रकार परिषद; SEBC आरक्षणावर ठाम!

करोडपती सासऱ्याने असं काय केलं की ३० वर्षीय सुनेनं थेट रचला कट, ६ लाखांची सुपारी देत संपवलं; धक्कादायक माहिती उघड

Nagara Road Accident : कामाच्या शोधात निघालेल्या मजुरांवर काळाचा घाला! गोंदिया-बालाघाट मार्गावर ट्रक-पीकअपच्या धडकेत 6 जण ठार, 3 वर्षीय बालकाचाही समावेश; 7 गंभीर

Marathi News Live Updates : काल केसनंद, आज खराडी... ऐश्वर्या जाधव यांच्या लावणी कार्यक्रमाला पुन्हा परवानगी नाकारली!

२८ चेंडूंत १३६ धावा! Mumbai Indians च्या फलंदाजाची हवा; १७३ धावांच्या वादळी खेळीने वेधले जगाचे लक्ष, IPL 2027 गाजवण्यासाठी सज्ज

SCROLL FOR NEXT