नाशिक

हर घर भगवा’ अभियान

CD
एक लाख भगव्या ध्वजांनी उजळणार नाशिक-त्र्यंबक ध्वजारोहणानिमित्त ‘हर घर भगवा’ अभियान सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २१ : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या स्वागतासाठी नाशिक आणि त्र्यंबकेश्वरनगरी भगवीमय होणार आहे. ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात ‘हर घर भगवा’ हे व्यापक अभियान राबविण्यात येणार आहे. घराघरांवर तब्बल एक लाख भगवे ध्वज फडकविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या अभियानाचा प्रारंभ कोजागरी पौर्णिमेला रविवारी (ता. २५) होणार आहे. सिंहस्थ कुंभमेळा हा केवळ धार्मिक सोहळा नसून तो भारतीय संस्कृती आणि अध्यात्माचा उत्सव असल्याने भाविकांच्या स्वागतासाठी भक्तिमय वातावरण निर्माण करण्याचा यामागील हेतू आहे. अभियानाच्या अंमलबजावणीसाठी दोन हजारांहून अधिक बूथ प्रमुखांना सक्रिय करण्यात आले आहे. नाशिकमधील सर्व आमदार आणि नगरसेवकांच्या मार्गदर्शनाखाली भाजपचे एक हजार ४७ आणि शिवसेनेचे एक हजार बूथप्रमुख काम करणार आहेत. नाशिक शहरात ७५ हजार, तर त्र्यंबकेश्वरमध्ये २५ हजार ध्वज लावण्याचे नियोजन आहे. विशेष म्हणजे या अभियानासाठी इंदूर, धुळे, जळगाव आणि अहिल्यानगर येथेही ध्वज तयार करण्याची यंत्रणा उभारण्यात आली असून, तेथून ध्वज नाशिकमध्ये दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. पालकमंत्री तथा कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून हे अभियान राबवले जात असून, नागरिकांच्या सहभागातून नाशिकमध्ये उत्सवी वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न यानिमित्ताने होत आहे. कोट भगवा ध्वज हा आपल्या संस्कृती आणि धर्माचे प्रतीक आहे. प्रत्येक नागरिकाने आपल्या घरावर भगवा ध्वज लावून या ऐतिहासिक सोहळ्यात सहभागी व्हावे. - गिरीश महाजन, कुंभमेळामंत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या घरातूनच SIR ला विरोध? २३ ऑक्टोबरला होणाऱ्या आंदोलनात पती परकला प्रभाकर होणार सहभागी

‘तुम्ही Gen Z नाही!’ दिल्ली हायकोर्टानं सौरभ दास अन् आशुतोष रांका यांना सुनावलं; फ्रान्समधील जाळपोळीच्या घटनांचाही केला उल्लेख...

Velhe News : किल्ले राजगडवर 'मर्दानी दसरा' संपन्न; राजगडावर शेकडो दुर्ग सेवकांची उपस्थिती

Latest Marathi News Live Update : चार ते पाच महिन्यांत देशात काहीतरी मोठं घडणार, राज ठाकरेंचा दावा

Ausa Crime : औसा हादरले! मदत केल्याच्या कारणावरून भरदिवसा तरुणावर कोयत्याने सपासप वार; पोलिसांच्या धाकावर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT