onion crop sakal
नाशिक

नाशिक : कांदा भावात घसरण सुरूच; शेतकरी आर्थिक कोंडीत

अरुण खंगाळ

लासलगाव (जि. नाशिक) : गेल्या काही दिवसांपासून स्थिर असलेले कांदा भावात (Onion Price) आता मोठी घसरण झाल्याने शेतकरी वर्ग आर्थिक कोंडीत सापडला आहे. दि २० ऑगस्ट रोजी उन्हाळ कांदा सरासरी १७४० रुपये प्रति क्विंटलने विक्री झाला होता, मात्र आठच दिवसात कांदा दरात २६० प्रति क्विंटलची घसरण लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत पहायला मिळाली.

यंदा आंध्रप्रदेश, कर्नाटक, गुजरात या राज्यातुन कांद्याचे चांगले उत्पादन होत असल्याने नाशिक जिल्ह्यातील कांदा मागणी कमी झाली आहे. तर दुसरीकडे देशाची कांदा निर्यात सुरू जरी असली तरी आपल्या तुलनेने पाकिस्तान \चा कांदा स्वस्त उपलब्ध होत असल्याने याचा फटका भारतीय कांद्याला बसलेला आहे. यामुळे देशात मुबलक कांदा असल्याने भावात मोठी घसरण सुरू झाली आहे. कांदा, टोमॅटो, भाजीपाला अगदी कवडीमोल भावात विकण्याची वेळ शेतकरी वर्गावर आली आहे.

कांदा आगार असलेल्या जिल्ह्यातील शेतकरी वर्गाने मागील वर्षी प्रमाणे चांगला भाव मिळेल या आशेवर कांदा चाळीत साठवून ठेवलेला आहे. बदलत्या वातावरणामुळे कांदा खराब होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे सध्या मिळणारा दर आणि झालेला खर्च निघत नसल्याने शेतकरी वर्ग मेटाकुटीस आलेला आहे. केंद्र सरकारने कांदा दरात होत असलेली घसरण थांबविण्यासाठी निर्यात प्रोत्साहन योजना राबविणे गरजेचे असल्याचे व्यापारी वर्गाकडून बोलले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : पुणे शहरात दहीहंडीत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १० मंडळांवर गुन्हे; ११६ मंडळांवर न्यायालयीन खटले दाखल

द्विशतकवीर Ishan Kishan बाद होताच तिलक वर्माने धावत जाऊन मारली मिठी! प्रतिस्पर्धी कर्णधार असले तरी जिंकली मनं; Photo Viral

Nagpur Crime : सीताबर्डीत टोळीयुद्धातून कुख्यात गुंडाचा खून; चार कुख्यात गुन्हेगारांना अटक

Sugar price: साखर दरवाढीचा खेळ संपला! भाव कधी कमी होणार? सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी

अमरावतीतल्या 'त्या' वाघिणीचा अचानक मृत्यू, काही तांसापूर्वी वनविभागाने केलं होतं बेशुद्ध; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT