Jindal Fire Accident  esakal
नाशिक

Jindal Fire Case : जिंदाल पॉली फिल्म कंपनीतील दुर्घटनेप्रकरणी विरोधक आक्रमक; मालकावर कारवाई सुरू

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : नाशिक येथील गोंदे एमआयडीसीतील जिंदाल कंपनीत झालेल्या अपघाताच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती नेमली असून समितीच्या अहवालानुसार कंपनीच्या मालकावर कारवाई करण्यात येत असल्याची माहिती कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी विधानपरिषदेत दिली.

मृत कामगारांच्या वारसांना कंपनी व्यवस्थापनामार्फत नोकरी देण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. (Opposition Aggressive in Jindal Poly Film Company Tragedy Action against owner Jindal Fire Case nashik news)

नाशिकमधील गोंदे येथील कंपनीत झालेल्या अपघातात तीन कामगारांचा मृत्यू तर २० कामगार जखमी झाले होते. याबाबत राष्ट्रवादीचे आमदार विक्रम काळे यांनी लक्षवेधी मांडली होती. त्यास उत्तर देताना मंत्री खाडे बोलत होते. यावेळी झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शशिकांत शिंदे, नरेंद्र दराडे, अनिकेत तटकरे, अनिल परब, जयंत पाटील यांनी सहभाग घेतला.

मंत्री खाडे म्हणाले, समितीच्या अहवालानुसार कंपनीच्या संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. तसेच कामगार आयुक्तालयाचे अधिकारी दोषी आढळल्यास त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल.

या दुर्घटनेतील तीन मृत कामगारांपैकी एका कामगाराच्या वारसास कारखाना व्यवस्थापनाकडून १५ लाख ७४ हजार ४०० रुपये, तर उर्वरित दोन कामगार विमा मंडळाचे सदस्य असल्याने, त्यांच्या वारसास नुकसान भरपाई राज्य कामगार विमा मंडळ कार्यालयामार्फत देण्याची कार्यवाही सुरू आहे.

हेही वाचा : कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...

शिवाय, मृत कामगारांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपये आणि जखमींचा वैद्यकीय खर्च शासनामार्फत केला जात आहे.

जिंदाल पॉली फिल्म प्रा. लि. कंपनीतील प्लँटमधून थर्मिक फ्लूईड ऑईलची गळती होऊन अनेक कामगार जखमी झाले होते. त्यानंतर तेथे भेट दिली असता, तेथील अग्निशमन यंत्रणा ही या घटनेच्या आधीपासूनच असल्याचे आढळल्याचे दानवे यांनी सभागृहात सांगितले.

अशा घटना टाळण्यासाठी व घटना घडल्यावर कारवाई व्हावी यासाठी औद्योगिक सुरक्षा व कामगार विभागच अकार्यक्षम असल्याचा मुद्दा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपस्थितीत केला. सर्व काही समोर असताना पोलिस कारवाई करत नाहीत. असा मुद्दाही दानवेंनी उपस्थित केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरात'ची घोषणा; अमित शाहांच्या उपस्थितीत नारेबाजी, व्हिडिओ व्हायरल

Katraj Issues : सोपानकाकानगरमध्ये नागरी सुविधांचा अभाव, नागरिकांमध्ये तीव्र नाराजी; तीन वर्षांपासून करत भरुनही महापालिकेचे दुर्लक्ष

Agriculture News : ऊस पिकावर हुमणीच्या प्रादुर्भावाचा धोका; कृषी विभागातर्फे प्रभावी उपाययोजना करण्याचे आवाहन

Women Empowerment: घरच नव्हे, गावही चालविणार! छप्पन्न गावांत लवकरच महिलाराज, १११ ग्रामपंचायतींचे आरक्षण जाहीर

IND vs ENG 2nd Test: हॅरी ब्रूकने 'खांद्या'ने वाचवली स्वतःची विकेट! लढवली अक्कल, पण झाला असता त्याचाच गेम; रिषभ पंत भडकला

SCROLL FOR NEXT