expired food file photo
expired food file photo esakal
नाशिक

Nashik Crime: शहरात मुदतबाह्य खाद्यपदार्थ विक्रीचा प्रकार उघडकीस

सकाळ वृत्तसेवा

मालेगाव : जिल्ह्यात प्रामुख्याने भेसळयुक्त खवा व मिठाई विक्रीचे प्रकार मोठ्या प्रमाणावर उघडकीस येत आहेत. त्यातच शहर व तालुक्यात मुदतबाह्य झालेल्या पॅक खाद्यपदार्थांची विक्री होत असल्याचे निदर्शनास आले आहे.

अन्न औषध प्रशासन व संबंधित यंत्रणेने या प्रकारांकडे लक्ष द्यावे. ग्राहकांनी जागृत राहून खरेदी करताना काळजी घेतल्यास या प्रकारांना आळा बसेल. सोयगाव नववसाहत भागातील जागृत ग्राहकाच्या बारकाईतून हा प्रकार उघडकीस आला. (Outdated food stalls exposed in city Nashik Crime)

सोयगाव येथील दिग्विजय बच्छाव यांनी दुकानातून मुलासाठी सकाळी बिस्कीट व टोस्ट खरेदी केले. दुकानदार विश्वासातील असल्याने त्याने खाद्यपदार्थ खरेदी करताना मुदत बघितली नाही.

सायंकाळी घरी गेल्यानंतर मुलगा दूध बिस्कीट खात असताना त्यांनी एक्सपायरी डेट तपासली असता खाद्यपदार्थ मुदतबाह्य असल्याचे आढळले. यानंतर त्यांनी टोस्ट पॅकेट तपासले असता तेही कालबाह्य आढळले.

त्यांनी खाद्यपदार्थांसह त्वरित दुकान गाठून विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे मिळाली. स्थानिक रहिवासी जमल्यानंतर अनेकांच्या बोलण्यातून अनेक दुकानांत असे प्रकार होत असल्याचे समजले.

दुकानदार वयस्कर असल्याने त्याला समज देऊन तसेच पुन्हा असा प्रकार पुन्हा होणार नाही, अशी ग्वाही संबंधिताने दिल्याने या प्रकरणावर पडदा पडला.

दरम्यान, शहरातील काही दुकानांत पाकीटबंद मुदतबाह्य खाद्यपदार्थांची विक्री होते. हे खाद्यपदार्थ विक्रीसाठी लहान शाळकरी मुलांना व घाईगर्दीत असलेल्या ग्राहकांना टार्गेट केले जाते.

ग्राहकांनीच समयसूचकता दाखवून पाकीटबंद खाद्यपदार्थ खरेदी करताना तारीख बघून घेतल्यास फसवणूक टळेल. शहरात काही दुकानदार मुदतबाह्य खाद्यपदार्थ अत्यल्प दरात खरेदी करतात. यातून नफा कमविण्याचा त्यांचा हेतू असतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Car Accident : ''जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी घटनास्थळावर पोहोचलो अन्...'', आमदार टिंगरेंनी अपघाताबद्दल आरोपावर स्पष्टच सांगितलं

Beed Bogus Voting : ''बोगस वोटिंग प्रकरणात कठोर कारवाई करा'' बीडच्या प्रकरणात शरद पवारांनी घातलं लक्ष

Pune Drunk Driving Accident: कल्याणीनगरच्या आपघात प्रकरणी थातूरमातूर कारवाई? पुण्याच्या पोलिस आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण

MS Dhoni: 'माझं चेन्नईबरोबरचं नातं...', निवृत्ती घेणार की नाही चर्चेदरम्यान धोनीच्या CSK बद्दलच्या भावना आल्या समोर

Latest Marathi News Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT