नाशिक

पाचोरा येथे ‘मविआ’चे धरणे आंदोलन

CD
PHO26B17511 पाचोरा ः धरणे आंदोलनप्रसंगी तहसीलदार विजय बनसोडे यांना निवेदन देताना ‘मविआ’चे पदाधिकारी व कार्यकर्ते. पाचोरा येथे ‘मविआ’चे धरणे आंदोलन उत्स्फूर्त प्रतिसाद; शासन विरोधी घोषणांनी शहर दणाणले सकाळ वृत्तसेवा पाचोरा, ता. २० ः येथील महाविकास आघाडीतर्फे सोमवारी (ता. १९) करण्यात आलेल्या धरणे आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. याप्रसंगी शासन विरोधी घोषणांनी शहर अक्षरशः दणाणले. छत्रपती शिवाजी महाराज चौकात सोमवारी (ता. १९) सकाळी राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, ‘मनसे’च्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विविध मागण्यांबाबत घोषणाबाजी करीत धरणे आंदोलन केले. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. अविनाश भालेराव, सचिन सोमवंशी, ॲड. अंकुश कटारे, बापू सोनार, नंदकुमार सोनार, इरफान मण्यार, शकील शेख, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नितीन तावडे, शिवसेना ‘उबाठा’चे उद्धव मराठे, खंडू सोनवणे, जळगाव येथील सामाजिक कार्यकर्ते शिवराम पाटील, खलील देशमुख, विकास वाघ, ॲड. अभय पाटील, सुनील शिंदे, सय्यद मुक्तार, दिलीप खोडपे, ऋषिकेश भोई, शुभम पाटील, कृष्णा दूंदुले, इस्माईल शेख, शंकर सोनवणे, राजेंद्र राणा, ज्ञानेश्वर चौधरी, सिताराम पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलनात सहभाग घेतला. शेतकऱ्यांना सरसकट एक लाख रुपये व शेतमजुरांना २५ हजार रुपये अनुदान मंजूर करावे. निवडणूक आयोगाचे ज्ञानेशकुमार यांचा राजीनामा घ्यावा. ‘एसआरआय’ रद्द करावा. विद्यार्थ्यांना शैक्षणिक फी माफ करावी. दिवाळीपूर्वी कर्जमुक्तीची घोषणा करावी. प्रलंबित असलेले दुष्काळी अनुदान शेतकऱ्यांना त्वरित देण्यात यावे. २०१४ पूर्वीची कृषी पंपांची वीज बिले माफ करावी. पीक विम्याची रक्कम त्वरित देण्यात यावी. अशा विविध मागण्यांबाबत तसेच शासन विरोधी घोषणाबाजी करण्यात आली. धरणे आंदोलनानंतर तहसीलदार विजय बनसोडे, पोलिस निरीक्षक राहुलकुमार पवार, नायब तहसीलदार विनोद कुमावत यांनी आंदोलनस्थळी येऊन निवेदन स्वीकारले. परिसरात चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. -------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Politics: ‘गोकुळ’ फॅक्टर तोडण्याचे भाजपपुढे तगडे आव्हान; शिक्षक, पदवीधर निवडणूक: ॲक्टिव्ह शिवसेना अन्‌ सायलेंट राष्ट्रवादीची डोकेदुखी

HARDIK PANDYA FAN: १००० किमी पायी चालत हार्दिक पंड्याला भेटायला पोहोचला चाहता! भारतीय स्टारने दिला असा प्रतिसाद, VIDEO चर्चेत

Gokul Election Result : 'गोकुळ'च्या निकालाने मंडलिक-मुश्रीफ वादाला उकळी! वीरेंद्र मंडलिक 'इन', नविद 'आउट; वाचा हसन मुश्रीफ यांच्या मुलाच्या पराभवामागची Inside story

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रात दुष्काळाचं सावट, दसरा मेळावा साधेपणाने : मंत्री सरनाईक

Shoumika Mahadik Gokul Election : शौमिका महाडिकांना गोकुळमधील पराभव जिव्हारी; सोशल मीडियावर पहिल्यांदाच व्यक्त केली प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT