धुळे : टुडे पान २ साठी..
--
फोटो क्रमांक : 33278
धुळे : पांझरा नदीवरील केटी वेअर बंधाऱ्यांत पाणी अडविण्यासाठी लोखंडी पाट्या बसविण्याच्या मागणीसाठी थेट नदी पात्रता आंदोलनास बसलेले संभाजी ब्रिगेडसह विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्षांचे पदाधिकारी.
--
पांझरा नदीवरील बंधाऱ्यांत पाणी अडविण्यासाठी आंदोलन
--
केटी वेअरला लोखंडी पाट्या बसविण्याची संभाजी ब्रिगेडची मागणी
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. २२ : पांझरा नदीवरील प्रभातनगर परिसरातील केटी वेअर बंधाऱ्यांना लोखंडी पाट्या बसवून पाणी अडवावे, या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडतर्फे बुधवारी (ता. २१) नदीपात्रात धरणे आंदोलन सुरू करण्यात आले. जिल्हाध्यक्ष हेमंत भडक यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या या आंदोलनाला विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि कामगार नेत्यांनी भेट देऊन पाठिंबा दिला.
-
पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवून त्याचा भविष्यातील पाणीटंचाईच्या काळात उपयोग व्हावा, अशी आंदोलकांची भूमिका आहे. पांझरा नदीवरील सिंधी कॉलनी आणि प्रभातनगर परिसरातील केटी वेअर बंधाऱ्यांना लोखंडी पाट्या बसविल्यास पाणीसाठ्यात वाढ होऊन भूजलपातळी सुधारण्यास मदत होईल. त्यामुळे परिसरातील विहिरी, बोअरवेल आणि हातपंपांच्या पाणीपातळीत वाढ होऊ शकते. संभाव्य दुष्काळी परिस्थितीत नागरिकांसह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होऊ नये, यासाठी प्रशासनाने वेळीच उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आंदोलकांनी केली. या वेळी ‘लोखंडी पाट्या टाकून पाणी अडविलेच पाहिजे’, अशा घोषणा देण्यात आल्या. या मागणीसंदर्भात संभाजी ब्रिगेडने संबंधित विभागाला निवेदन दिले आहे.
-
महापालिकेचे उपायुक्त हेमंत निकम यांनाही प्रत्यक्ष भेटून निवेदनाची प्रत देण्यात आली. बंधाऱ्यांना लोखंडी पाट्या बसविणे, आवश्यक दुरुस्ती करणे आणि पाणी अडविण्याची व्यवस्था कार्यान्वित करण्यासाठी प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशी भूमिका संघटनेने मांडली. आंदोलनस्थळी संविधान संरक्षण समितीचे हरिश्चंद्र लोंढे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, पंडितराव गोसावी, ज्येष्ठ कामगार नेते भानुदास बगदे, दलित नेते सिद्धार्थ जगदेव, भैय्या शिंदे, एल. आर. राव, दत्तात्रय पाटील यांनी भेट देऊन आंदोलनाला पाठिंबा दिला. संभाजी ब्रिगेडचे जिल्हा सचिव महेश पाटील, जिल्हा उपाध्यक्ष नंदू अहिरराव, महानगराध्यक्ष भूषण बागुल, नितीन जाधव, अमर फरताडे आणि मनोज रुईकर यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले. संविधान संरक्षण समिती, पुरोगामी विचारमंच आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्तेही उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.