नाशिक

गांधीतीर्थ येथे आगळावेगळा उपक्रम; ४० पालक व शिक्षकांचा सहभाग

CD
गांधीतीर्थ येथे ‘पीक वॉक’; ४० पालक, शिक्षकांचा सहभाग सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २४ : लोकशिक्षण मंडळ संचालित ज. सु. खडके प्राथमिक विद्यामंदिराच्या शाळा व्यवस्थापन समितीतर्फे जैन हिल्स येथील गांधीतीर्थ येथे ‘पीस वॉक’ या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमातून पालक आणि शिक्षकांना आंतरिक शांतता, आत्मिक समाधान आणि वैश्विक एकात्मतेचा अनुभव घेण्याची संधी मिळाली. या उपक्रमात गांधीतीर्थ येथील प्राध्यापक अश्विन झाला यांनी मानवी शरीराची रचना आणि पंचमहाभूतांचे महत्त्व याविषयी सखोल मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनातून निसर्ग, मानवी जीवन आणि विश्व यांच्यातील परस्परसंबंध उलगडण्यात आले. पालक आणि शिक्षकांनी एकत्रितपणे या उपक्रमात सहभागी होत शांतता व सकारात्मकतेचा अनुभव घेतला. या ‘पीस वॉक’मध्ये २५ पालक आणि १५ शिक्षक असे एकूण ४० जण सहभागी झाले होते. दैनंदिन जीवनातील धावपळीतून काही वेळ स्वतःसाठी देत मनःशांतीचा अनुभव घेणे, तसेच पालक आणि शिक्षक यांच्यातील संवाद व समन्वय वाढविणे, हा या उपक्रमाचा उद्देश होता. उपक्रमासाठी विद्यामंदिराचे मुख्याध्यापक सुनील पवार यांचे मार्गदर्शन लाभले. शाळा व्यवस्थापन समितीच्या प्रमुख पूनम पाटील यांनी नियोजन केले. समितीचे कार्याध्यक्ष पवन खंबायत, उपकार्याध्यक्ष जनार्दन बाविस्कर तसेच इतर सदस्यांनी उपक्रमाच्या यशस्वितेसाठी सहकार्य केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIRAT KOHLI: विराट कोहलीचा सराव सुरू, न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिकेचा थरार कधी रंगणार? जाणून घ्या ५ सामन्यांचं संपूर्ण वेळापत्रक

Manoj Jarange Patil : ५०० कोटींच्या प्रकरणाचा छडा लागेपर्यंत विषय संपवणार नाही; मनोज जरांगेंचा फडणवीस, शिंदेंना तपासाचे आव्हान

''गेल्या दोन दिवसांपासून आम्ही...''; ५०० कोटींच्या कथित ऑडियो क्लिपबाबत श्रीकांत शिंदे पहिल्यांदाच बोलले, काय म्हणाले?

IND vs NZ 2nd T20: ६ चेंडूंत ११ धावा, शेवटच्या चेंडूपर्यंत थरार! तिलक-नितीशने पलटवला सामना, भारताचा न्यूझीलंडवर दणदणीत विजय!

AI Revolution: तुम्ही फक्त उद्योग सुरू करण्याचे धाडस करा, AI एजंट्सच चालविणार तुमचा बिझनेस? कसे ते वाचा...

SCROLL FOR NEXT