Performance of Kathak Dances in National Pathways esakal
नाशिक

Republic Day 2024 : राष्ट्रीय पथसंचलनात कथक नृत्‍यांगनांचे सादरीकरण; प्रजासत्ताक दिनी कार्यक्रमाची वाढविणार शोभा

प्रजासत्ताक दिनी दिल्ली येथे आयोजित मानाच्या अशा राष्ट्रीय पथसंचलनात नाशिकमधील आठ कथक नृत्यांगना सादरीकरण करणार आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Republic Day 2024 : प्रजासत्ताक दिनी दिल्ली येथे आयोजित मानाच्या अशा राष्ट्रीय पथसंचलनात नाशिकमधील आठ कथक नृत्यांगना सादरीकरण करणार आहेत.

शुक्रवारी (ता. २६) कर्तव्यपथ (राज पथ) येथी पथसंचलनात नाशिक नृत्यांगण कथक नृत्य संस्थेच्या नर्तिका आपल्या कथक नृत्याचे सादरीकरण करतील. (Performance of Kathak Dance in National Pathways of nashik dance on republic day 2024 nashik news)

यंदा नारीशक्ती आणि विकसित भारत अशी नृत्य सादरीकरणाची संकल्पना असेल. या सादरीकरणासाठी भारत सरकारच्या संगीत नाटक अकादमीच्या प्रमुख ज्येष्ठ नृत्यांगना डॉ. संध्या पुरेचा यांचे विशेष मार्गदर्शन लाभते आहे. सहभागी होणाऱ्या आठही विद्यार्थिनी कथक नृत्यांगना आणि गुरू कीर्ती भवाळकर यांच्या ज्येष्ठ शिष्या आहेत.

गुरू कीर्ती भवाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली नृत्यांगना गेली बारा ते पंधरा वर्षे कथक नृत्याची तालीम घेतली आहे. प्रजासत्ताक दिनी सादर होणाऱ्या पथसंचलनात हा समूह कथक या शास्त्रीय नृत्याचे तसेच नाशिक नगरीचे आणि महाराष्ट्राचे राष्ट्रीय पातळीवर प्रतिनिधित्व करेल.

विशेष म्हणजे केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाने आयोजित केलेल्या वंदे भारतम या स्पर्धेतील निवड प्रक्रिया पार करून समूहातील नृत्य कलाकारांची निवड झाली आहे. तन्वी कुलकर्णी, जान्हवी कुलकर्णी, श्रावणी पुराणिक, साक्षी पुजारी, रिया भावसार, वसुंधरा आहेर, तेजल मांडवकर आणि अनुष्का गोखले अशी या विद्यार्थिनींचे नावे आहेत.

नवी दिल्ली येथील कर्तव्यपथ येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समोर कथक नृत्यांगना नृत्य सादरीकरण करतील. फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युअल मॅक्रॉन यांचीही या वेळी उपस्‍थिती असेल. सर्व दिग्गजांसमोर नृत्य सादरीकरण करण्याचा मान नाशिकच्या नृत्यांगनांना मिळाला आहे, ही नृत्यांगण कथक नृत्य संस्थेसाठी तसेच नाशिककरांसाठी अत्यंत अभिमानाची बाब असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic : पुण्यातील सिंहगड रोड, वारजेत वाहनांच्या लांबच लांब रांगा, अमित शहा यांच्या दौऱ्यामुळे वाहतूक वळवल्याने वाहतूक कोंडी

Kolhapur Rain Weather : कोल्हापुरातील सहा धरणांतून १२ हजार क्युसेक विसर्ग, राधानगरी धरण ७० टक्क्यांवर; पावसाचा जोर वाढणार

अधिवेशनात खंडाजंगी! अत्याचार प्रकरणातील गुन्हेगारांना अटक करा: आमदार रोहित पवार आक्रमक; पोलिसांवर कोणाचा दबाव?

Latest Maharashtra News Updates : छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात, मंदिरासमोर भाविकांना कारने चिरडले

Ashadhi Ekadhashi 2025: यंदा 5 की 6 जुलै कधी आहे आषाढी एकादशी? जाणून घ्या शुभ मुहुर्त अन् पूजा करण्याची विधी

SCROLL FOR NEXT