मेन
---
फोटो : H33164, H33163, H33165, H33167, H33168, H33169
फाळके स्मारक : थीम पार्कचे मुख्य प्रवेशद्वार. दुसऱ्या छायाचित्रात ‘दिल्ली ६’ चित्रपटातील इंडिया गेटची प्रतिकृती. तिसऱ्या छायाचित्रात बाहुबली. चौथ्या छायाचित्रात ‘दिलवाले दुल्हनियाँ ले जायेंगे’ मधील शेवटचे आयकॉनिक दृश्य. पाचव्या छायाचित्रात
शोले चित्रपटातील दृश्य. शेवटच्या छायाचित्रात बॉलिवूड स्ट्रीटवरील चित्रीकरण शिल्प. .
--
भंगारातून साकारले बॉलिवुडचे अजरामर दृश्य
फाळके स्मारकात शोले ते बाहुबलीच्या कलाकृतींचे आकर्षण
राजेंद्र बच्छाव : सकाळ वृत्तसेवा
इंदिरानगर, ता. २१ : फाळके स्मारकात आकाराला आलेले ‘आर्ट रेसिडेन्सी उद्यान’ अर्थात बॉलिवूड थीम पार्क उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असून, दिवाळीच्या सुटीमध्ये नाशिककरांना त्याचा आनंद घेता येईल. यामुळे पुन्हा पर्यटनस्थळाला पूर्वीची झळाळी येणार आहे. दिल्ली येथील कंपनीच्या माध्यमातून शेकडो टन भंगारामधून ‘टाकाऊपासून टिकाऊ उद्देशाने बॉलिवूडमधील गाजलेल्या चित्रपटांचे आयकॉनिक सीन्स आणि एक आर्ट गॅलरी येथे साकारण्यात आली आहे.
चित्रपटमहर्षी दादासाहेब फाळकेंच्या नावाने हे स्मारक असल्याने बॉलिवुड थीम ठेवण्यात आली आहे. आठ व्यावसायिक मूर्तिकारांच्या मार्गदर्शनाखाली दिल्ली, आंध्र प्रदेश, राजस्थान येथील सुमारे दीडशे कारागिरांनी हे आयकॉनिक सीन उभारले आहेत. यामध्ये लहान मुलांच्या खेळणी विभागात ऋतिक रोशनच्या ‘कोई मिल गया’चा जादू, राजेश खन्नाचा ‘हाथी मेरा साथी’ मधील महाकाय हत्ती, ‘स्टॅन्ली का डिब्बा’ चा मोठा डब्बा आणि ‘मकडी’ च्या रूपातील खेळण्याचा समावेश आहे. यासोबतच राणी पद्मावती चित्रपटातील राजा मानसिंग यांनी बांधलेला अमेर फोर्ट, दादासाहेब फाळके यांचा कॅमेरा आणि रिल, केदारनाथ चित्रपटातील सारा अली खान आणि सुशांत सिंग राजपूत यांचे घोड्यावरील दृश्य , बाहुबली चित्रपटातील अभिनेता प्रभास शिवलिंग खांद्यावर घेतलेली भावमुद्रा, शोले चित्रपटात धर्मेंद्र आणि अमिताभ यांचे दुचाकीवरील ये दोस्ती गीत, दिलवाले दुल्हनियाँ ले जायेंगे या चित्रपटातील क्लायमॅक्सचे काजोल, शाहरुख सोबत रेल्वेत बसतानाचे दृश्य आणि अभिषेक बच्चन यांच्यातील दिल्ली ६ या चित्रपटातील इंडिया गेटजवळ चित्रित केलेल्या दृश्याचा सेटसह इतर कलाकृतींचा समावेश आहे. या थीम पार्कमुळे संपूर्ण स्मारकाचे चित्र पालटले असून पुन्हा एकदा ते पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरेल, अशा अपेक्षा वाढल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.