धुळे : टुडे पान २ साठी..
--
फोटो क्रमांक : 33182
नगाव (ता. धुळे) : प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट प्रसंगी एसव्हीकेएम एनएमआयएमएसच्या स्कूल ऑफ फार्मसी ॲन्ड टेक्नॉलॉजी मॅनेजमेंटचे डी. फार्मसीचे विद्यार्थी. शेजारी प्राध्यापक, कर्मचारी.
--
एसव्हीकेएमच्या विद्यार्थ्यांची नगाव आरोग्य केंद्रास भेट
--
प्राथमिक आरोग्य सेवेची कार्यपद्धती, जबाबदारीचा घेतला अनुभव
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. २१ : येथील एसव्हीकेएम एनएमआयएमएस ग्लोबल युनिव्हर्सिटीजच्या स्कूल ऑफ फार्मसी ॲन्ड टेक्नॉलॉजी मॅनेजमेंटमधील डी. फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी नगाव (ता. धुळे) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला शैक्षणिक भेट दिली. वर्गातील सैद्धांतिक ज्ञानाला प्रत्यक्ष कर्माची आणि व्यावहारिक अनुभवाची जोड मिळावी, या उद्देशाने या अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते.
-
या शैक्षणिक भेटीदरम्यान डी. फार्म प्रथम आणि द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत ग्रामीण भागातील नागरिकांना उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या विविध आरोग्यसेवांची सविस्तर माहिती घेतली. आरोग्य केंद्राची दैनंदिन कार्यपद्धती, रुग्ण नोंदणी प्रक्रिया, प्राथमिक तपासणी, औषध साठा व वितरण व्यवस्था, आरोग्यविषयक मार्गदर्शन आणि आजार प्रतिबंधक सेवांची अंमलबजावणी याविषयी आरोग्य कर्मचाऱ्यांकडून विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. ग्रामीण भागातील नागरिकांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र ही महत्त्वाची कडी असते. त्यामुळे ही कार्यप्रणाली समजून घेणे भावी फार्मासिस्टसाठी फायदेशीर ठरणार आहे.
-
या भेटीत विद्यार्थ्यांनी रुग्णांशी साधायचा संवाद, औषधांचा सुरक्षित व योग्य वापर, समाजात आरोग्यविषयक जनजागृती निर्माण करणे आणि विविध आरोग्य उपक्रमांचे महत्त्व या गोष्टी जाणून घेतल्या. विशेषतः ‘सोशल फार्मसी’ या विषयाच्या अनुषंगाने समुदायाच्या आरोग्यविषयक गरजा, आजारांचा प्रतिबंध, आरोग्य शिक्षण आणि प्राथमिक स्तरावरील उपचारांमध्ये फार्मासिस्टची भूमिका यावर विद्यार्थ्यांनी अभ्यास केला. भेटीबद्दल संस्थेचे प्राचार्य डॉ. समीर गोयल यांनी समाधान व्यक्त केले. समन्वय विभागप्रमुख डॉ. मनोज जोगराणा, प्रा. गौरव पाटील यांनी संयोजन केले. या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांसोबत प्रा. नंदकिशोर तलवारे, प्रा. अमृता अमृतकर, प्रा. राशिद अन्सारी, प्रा. रोहित पवार, प्रा. पूजा पाटील आणि भूषण पाटील उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.