नाशिक

पिंप्राळा वसुली शिबिरात चार तासांत दोन लाखांची वसुली

CD
पिंप्राळ्यातील वसुली शिबिरात चार तासांत दोन लाखांची वसुली निमडी शाळा परिसरात महापालिकेचा उपक्रम सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २३ : मिळकतधारकांना कर भरण्याची सुविधा त्यांच्या परिसरातच उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महापालिकेतर्फे पिंप्राळा येथील निमडी शाळा परिसरात आयोजित करण्यात आलेल्या वसुली शिबिराला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून अवघ्या चार तासांत दोन लाख आठ हजार रुपयांचा मिळकत कर जमा झाला. या शिबिरात ३० मिळकतधारकांनी कर भरून महापालिकेच्या महसूल वसुलीला हातभार लावला. महापालिका आयुक्त आदित्य जिवने यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवारी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत हे शिबिर सुरू होते. मिळकतधारकांना कर भरण्यासाठी महापालिकेच्या कार्यालयात जाण्याची गरज भासू नये, तसेच कर भरण्याची प्रक्रिया अधिक सुलभ व्हावी, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश होता. स्थानिक पातळीवरच कर भरण्याची सुविधा उपलब्ध झाल्याने नागरिकांना वेळ आणि श्रमाची बचत करता आली. पिंप्राळा येथील शिबिराला मिळालेला नागरिकांचा प्रतिसाद पाहता, कर वसुलीसाठी असे उपक्रम अजून राबविले जाणार असल्याची माहिती प्रशासनाकडून राबविले जाणार असल्याचे माहिती देण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IMD weather forecast 24 October : २४ ऑक्टोबरला देशातील हवामानात मोठा उलटफेर; गुलाबी थंडी वाढणार की पावसाची एन्ट्री? पाहा हवामानाचा नवा अंदाज!

शिवरायांच्या स्वराज्याची शान! महाराष्ट्रातील ‘या’ 5 किल्ल्यांना एकदा तरी भेट द्याच

Marathi News Live Updates: नाशिकमध्ये कांद्याने भरलेला पिकअप पलटी, दुचाकीस्वार गंभीर जखमी

Global internet security threat : इंटरनेट विश्वात मोठा भूकंप! गुगल, ॲमेझॉनसह OpenAI हाय अलर्टवर; जगभरातील अनेक वेबसाइट्स अचानक का बंद झाल्या?

भारतीय संघात बदल; ईशान किशनची माघार, त्याच्याजागी संघात नवा खेळाडू

SCROLL FOR NEXT