PM Modi esakal
नाशिक

PM Modi Nashik Visit: पंतप्रधानांचा रोड-शो एक किमी अंतरासाठी; बंदोबस्तासाठी परजिल्ह्याचे पोलिस येणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी (ता. १२) नाशिक दौऱ्यावर येत आहेत.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी (ता. १२) नाशिक दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी यांचा रोड-शो करण्याचा घाट घातला जात आहे. परंतु त्यांच्या प्रस्तावित अडीच तासांच्या दौऱ्यात संभाव्य रोड-शो होण्याची शक्यता कमी झाली आहे.

झालाच तर औरंगाबाद रोडवर अवघ्या अर्ध्या वा एका किलोमीटर अंतरासाठी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिस यंत्रणेची जय्यत तयारी सुरू असून, परजिल्ह्यातून सुमारे पाच हजार पोलिस बंदोबस्तासाठी येणार आहेत. (PM Modi road show for one km other district police will come for security national youth festival nashik)

नाशिकमधील तपोवनात शुक्रवारी (ता. १२) राष्ट्रीय युवा महोत्सव होत आहे. या महोत्सवासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार आहेत. दिल्ली येथून ते विशेष विमानाने ओझर विमानतळावर सव्वाअकरापर्यंत पोचतील.

त्यानंतर ते ओझर विमानतळावरून हेलिकॉप्टरने नाशिक-औरंगाबाद रोडवरील निलगिरी बाग येथे उभारण्यात आलेल्या हेलिपॅडवर उतरतील. त्यानंतर मोटारीने तपोवनातील साधुग्राम येथील महोत्सवाच्या कार्यक्रम स्थळाकडे निघतील.

सव्वाबारा ते दोनपर्यंत ते महोत्सवामध्ये उपस्थित राहून मार्गदर्शन करतील. त्यानंतर पुन्हा ते मोटारीने निलगिरी बागेतील हेलिपॅडवर येतील आणि हेलिकॉप्टरने मुंबईकडे रवाना होणार आहेत.

दरम्यान, पंतप्रधान मोदी यांच्या या दौऱ्यात औरंगाबाद रोडवर रोड-शो करण्याचा घाट घातला जातो आहे.

तरीही निलगिरी बागेतून तपोवनाकडे मोटारी जात असताना या अडीच किलोमीटर अंतराच्या मार्गावरील अखेरच्या एका किलोमीटर अंतरादरम्यान रोड-शो करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यादृष्टिकोनातूनही पोलिस यंत्रणेने सज्जतेची तयारी केलेली आहे.

चोख बंदोबस्त

पंतप्रधानांच्या प्रस्तावित दौऱ्यानुसार पोलिस बंदोबस्ताचे चोख नियोजन करण्यात आलेले आहे. नाशिकसह धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, ठाणे येथील पोलिस अधिकारी-कर्मचारी या बंदोबस्तासाठी येणार आहेत.

याशिवाय, राज्य राखीव पोलिस दलाच्या तुकड्यांसह विशेष पथकांनाही पाचारण केले जाणार आहे. सुमारे पाच ते सहा हजार पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बंदोबस्ताचे नियोजन आखण्यात आलेले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT