pm street vendor atmanibhar nidhi scheme will connect street vendors to zomato swiggy Google
नाशिक

फेरीवाले होणार स्विगी, झोमॅटोशी कनेक्ट! 12 हजार जाणांना लाभ

विक्रांत मते

नाशिक : केंद्र सरकारच्या पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी (पीएम) (pm street vendor atmanibhar nidhi) योजनेंतर्गत महापालिका हद्दीत आतापर्यंत बारा हजार ३६८ पथविक्रेत्यांना बारा कोटी ३१ लाख रुपयांचे कर्ज वितरण करण्यात आले असून, योजनेंतर्गत कर्ज घेतलेल्या पथविक्रेत्यांपैकी अन्न पदार्थ विकणाऱ्या फेरीवाले अंतर्गत कर्जाचा लाभ घेतला आहे. अशा सर्व खाद्यपदार्थ विक्रेत्यांना ऑर्डर मिळण्यासाठी स्विगी (Swiggy) व झोमॅटो (Zomato) कंपन्यांसोबत जोडले जाणार आहे.

केंद्र सरकारकडून पथविक्रेत्यांसाठी ‘स्वनिधी से समृद्धी’ अभियान सुरू करण्यात आले आहे. यात पथविक्रेते व त्यांच्या कुटुंबीयांना पीएम मातृ वंदना योजना, जननी सुरक्षा योजना, पीएम सुरक्षा बिमा योजना, पीएम जीवन ज्योती बिमा योजना, पीएम जनधन योजना, एम श्रम योगी मानधन योजना, वन नेशन वन रेशनकार्ड आदी आठ योजनांचा लाभ दिला जात आहे. नाशिक शहरात १२, ३६८ पथ विक्रेत्यांची सोशल इकॉनॉमी प्रोफाईल भरत राज्यात अव्वल स्थान मिळविले आहे. एकूण ५३,१५९ लाभार्थींपैकी पात्र लाभार्थीना या आठ योजनांचा बँक, जिल्हा पुरवठा विभाग, कामगार आयुक्त विभाग, आरोग्य विभागामार्फत २८,४२८ लाभार्थ्यांना लाभ दिला जात असल्याची माहिती महापालिकेच्या उपायुक्त करुणा डहाळे यांनी दिली.

डिजिटल व्यवहारावर कॅशबॅक

कर्ज मिळालेल्या पथविक्रेत्यांना डिजिटल व्यवहार करण्यासाठी प्रवृत्त केले जात आहे. त्यासाठी डिजिटल व्यवहार केल्यास प्रत्येक व्यवहारावर एक रुपया कॅशबॅक मिळणार आहे. त्यासाठी ‘भारत पे’ या पेमेंट अग्रीग्रेटरची नेमणूक करण्यात आली आहे. त्यासाठी पथविक्रेत्यांना क्युआर कोड देण्याबरोबरच व्यवहारासाठीचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्याचबरोबर अन्नपदार्थ विक्री करणारे फेरीवालेअंतर्गत कर्ज घेतलेल्या विक्रेत्यांना अधिक ऑर्डर मिळण्यासाठी स्विगी व झोमॅटो कंपन्यांसोबत जोडले जाणार इच्छुक विक्रेत्यांनी स्विगी साठी ९०१५५००८०० व झोमॅटोसाठी ८०४६८१०३३० या क्रमांकावर फक्त मिस कॉल देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC: PAK vs SL सामन्यात थरार! ४,६, ६, ६... श्रीलंकेच्या कर्णधारानं दिलेलं पाकिस्तानला टेन्शन, पण शेवटच्या चेंडूवर यजमान पराभूत

PAK vs SL: श्रीलंकेने १४८ धावा करताच पाकिस्तानचा 'गेम ओव्हर'! T20 WC सेमीफायनल भारतातच होणार...

छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले शिल्प महाराष्ट्रात नाही, तर तमिळनाडूच्या 'या' किल्ल्यावर; मराठ्यांचा ज्वलंत इतिहास, एकदा नक्की बघा

T20 WC, PAK vs SL: साहिबजादा फरहानचे शतकासह विश्वविक्रम, पाकिस्तान २०० पार; पण श्रीलंकेत फिक्सिंगची चर्चा; जाणून घ्या कारण

Ganja Seized : बारामतीत अडीच कोटींचा 470 किलो गांजा हस्तगत...

SCROLL FOR NEXT