Bribe crime esakal
नाशिक

Nashik Crime News : लाच घेताना घोटीतील पोलिसाला अटक

सकाळ वृत्तसेवा

घोटी : घोटी पोलिस ठाण्यातील पोलिस नाईक रविराज जगताप यांना दहा हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

यातील तक्रारदारांच्या नातेवाईकांविरुद्ध घोटी पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या अदखलपात्र गुन्ह्याप्रकरणी मदत व यापूर्वी वेळोवेळी मदत केल्याच्या मोबदल्यात त्यांनी दहा हजाराची मागणी केली होती. पंचासमक्ष दहा हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारताना पथकाने त्यांना अटक केली. सापळा व तपास अधिकारी पोलिस निरीक्षक अनिल बागूल, पोलिस नाईक अजय गरुड, किरण अहिरराव, प्रकाश महाजन, हवालदार संतोष गांगुर्डे या कारवाईत सहभागी होते.

हेही वाचा: सीमावादात रक्त सांडायला मराठी माणूसच का?

नाशिक परिक्षेत्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. ‘कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्यातर्फे खासगी व्यक्तिने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा असे आवाहन श्रीमकी वालावलकर यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MLA Rohit Pawar : एमपीएससी प्रशासनातील घोटाळा मुंढे बाहेर काढतील असा विश्वास

Water Supply : ३२ समाविष्ट गावातील नागरिकांना दिलासा! महापालिकेचे नवीन धोरण; सदनिकाधारकांना पाणी देणे बिल्डरला बंधनकारक

Latest Marathi News Live Update : शेतकरी कर्जमुक्ती योजनेची तिसरी यादी जाहीर; ३.५१ लाख शेतकऱ्यांना दिलासा

Jammu Kashmir : पूंछमध्ये LoC जवळ मोठा स्फोट; लष्कर-ए-तोयबाचा कमांडर मोहम्मद फैजानसह चौघांचा मृत्यू

IND A vs NZ A: न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारताच्या संघात मोठा बदल; रिषभ पंत बाहेर, तर २१ वर्षांचा खेळाडू घेणार जागा

SCROLL FOR NEXT