Poor condition of roads in Deola city Nashik News  esakal
नाशिक

गाडी खड्ड्यात आदळली... म्हणजे देवळा आलं...

मोठाभाऊ पगार

देवळा (जि. नाशिक) : देवळा शहरात प्रवेश करणाऱ्या तीनही रस्त्यांवर खड्डे पडल्याने गाडी आदळली की समजून घ्यावे, देवळा आले, अशी स्थिती या शहरानजीकच्या राज्यमार्गांची (State highways) झाली आहे. हे खड्डे बुजवत कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे. पुन्हा पुन्हा दुरुस्ती करूनही त्याच ठिकाणी खड्डे पडत असल्याने या खड्ड्यांचा प्रश्न एकदाचा निकाली काढावा, अशी मागणी होत आहे.

देवळा शहराच्या प्रवेशद्वाराजवळ मालेगावकडून येतांना मालेगाव नाक्याजवळ, नाशिककडून येतांना महादेव मंदिराजवळ, सटाण्याकडून येताना महाविद्यालयाजवळ तर कळवणकडून येताना हौसिंग सोसायटीजवळ रस्त्याची दुरवस्था झाली आहे. मोठमोठे खड्डे असल्याने वाहने चालवणे अवघड होत आहे. पाच कंदील ते महाविद्यालयादरम्यान खड्ड्यांची तीव्रता मोठी आहे. खड्डे टाळावे तर अपघाताला आमंत्रण आणि न टाळावे तर गाडी खड्ड्यात यामुळे वाहनचालक बेजार आहेत. दुचाकीस्वारांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही. खड्ड्यांमुळे नेहमीच वाहतूक ठप्प होते. पावसाचे पाणी या खड्ड्यात साचल्यास चित्र आणखी अवघड होते. त्यामुळे या सर्व खड्ड्यांची कायमस्वरूपी दुरुस्ती व्हावी अशी मागणी येथील श्याममराव कुलकर्णी, पी. के. आहेर यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! CJP च्या दोन मागण्या सरकारकडून मान्य, तिसरीसाठी उद्या पर्यंतची मागितली वेळ, धर्मेंद्र प्रधान राजीनामा देणार?

Latest Marathi News Live Update : पुण्यात पोलीस चौकीसमोरच गोळीबार, तीन राऊंड फायर, एक जण जखमी

Crime News: पहिल्या पतीचं निधन, दुसऱ्यानं सोडलं; नंतर पत्नीनं तिसऱ्या नवऱ्याला जिवंत जाळून संपवलं, धक्कादायक कारण समोर

Vaibhav Sooryavanshi : वैभवने विश्वविक्रमानंतर 'A' अक्षर का दाखवले? जाणून घ्या सेलिब्रेशनमागची हृदयस्पर्शी गोष्ट

Pune Crime: पुण्यात पोलीस चौकीसमोरच तरुणावर झाडल्या गोळ्या, धक्कादायक घटनेने शहरात खळबळ; नेमंक काय घडलं?

SCROLL FOR NEXT