वीजपंप चोरी esakal
नाशिक

नाशिक : सोयगाव-कॅम्प भागात वीजपंप चोरांचा सुळसुळाट

सकाळ वृत्तसेवा

मालेगाव (जि. नाशिक) : शहरातील तापमानाचा पारा वाढत असतानाच उन्हामुळे पाण्याची मागणी वाढली आहे. यातच सोयगाव व कॅम्प भागात एकांत बंगले, सोसायट्या व घरांमधून घरगुती वीजपंप चोरीला जाण्याचा घटना वाढल्या आहेत. वीजपंप चोरीमुळे नागरीक त्रस्त झाले आहेत.

शहरानजीकच्या सोयगाव, दाभाडी शिवार, नामपूर रोड, कलेक्टर पट्टा आदी भागात नागरी वस्ती वाढली असली तरी रस्ते, दळणवळण व अन्य सोयी- सुविधांचा अद्याप अभाव आहे. अमृत योजनेमुळे शहरातील सर्व भागात पाणीपुरवठा होत असला तरी कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने घरोघरी वीजपंप आहेत. हेच वीजपंप चोरट्यांच्या उत्पन्नाचे साधन ठरले आहेत. गेल्या आठवड्यात येथील विजया रेसिडेन्सी या इमारतीत तीन वेळा वीजपंप चोरीच्या घटना घडल्या. वीजपंप चोरीमुळे ऐन उन्हाळ्यात रहिवाशांना पाणीटंचाई सहन करावी लागते. शिवाय आर्थिक भूर्दंड सहन करावा लागतो. प्रामुख्याने पार्किंगमधून वीजपंप चोरीच्या घटना घडत आहेत. पोलिसांनी परिसरात गस्त वाढवून वीजपंप चोरट्यांना जेरबंद करावे, अशी मागणी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Milk Uninon Kolhapur News : ‘गोकुळ’ उभारण्यासाठी आनंदराव पाटील चुयेकरांनी घरातील सोनेही गहाण ठेवलं; शशिकांत चुयेकर भावुक

Samruddhi Sugar Factory: ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा! समृद्धी कारखाना देणार प्रतिटन ३०० रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान

Viral Story : ९५ हजार पगाराची नोकरी गेली, घरच्यांचं वागणंच बदललं; म्हणाले- तुला जन्म देऊन चूक झाली, २२ वर्षीय तरुणाने पोस्टद्वारे मांडली व्यथा

Dairy Farmers: दूध उत्पादकांचे अर्थकारण कोलमडले; पशुखाद्याच्या दरात चार महिन्यांत २५ ते ३५ टक्के वाढ, दुधाच्या दराचा ताळमेळ बसेना

Maharashtra Live News : ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील निवडणूक मोदी शाहांनी आपल्यावर घेतली : आशुतोष रांका

SCROLL FOR NEXT