Ashram-schools esakal
नाशिक

थकीत वीजबिलापोटी आश्रमशाळांचा वीजपुरवठा खंडित

कुणाल संत

नाशिक : थकीत वीजबिलापोटी आदिवासी विकास विभागाच्या नाशिक प्रकल्प कार्यालयांतर्गत येणाऱ्या दहा आश्रमशाळांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. नंतर प्रकल्प कार्यालय स्तरावरून तत्काळ विजेचा भरणा करण्यात आला. मात्र, वीजपुरवठा खंडित करण्याची वेळ का आली? याबाबत संबंधित आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकांकडे चौकशी केली जाणार आहे. (Power-supply-cut-off-Ashram-schools-nashik-marathi-news)

दहा दिवसांपासून वीजपुरवठा खंडित

राज्यात आदिवासी विकास विभागांतर्गत चालविल्या जाणाऱ्या शाळांचे वीजबिल, पाणीपट्टीसंदर्भात स्वतंत्र लेखाशीर्ष असून, त्यातून राज्यातील सर्व शाळा, वसतिगृहे, एकलव्य शाळांची बिले मागणी होताच तत्काळ भरली जातात. मात्र, नाशिक प्रकल्पांतर्गत येत असलेल्या दहा आश्रमशाळांचे वीजबिल न भरल्यामुळे वीजपुरवठा दहा दिवसांपासून खंडित झाला होता. सध्या आश्रमशाळा बंद असल्या तरी परिसरातील कर्मचारी अंधारात होते.

वीजपुरवठा सुरळीत

थकीत वीजबिलामुळे आश्रमशाळेचा पुरवठा खंडित केल्याची माहिती मिळताच नाशिक प्रकल्प स्तरावरून अपर आयुक्त कार्यालयाकडे निधीची मागणी करण्यात आली. मंगळवारी (ता. २२) सायंकाळी निधी मिळताच आश्रमशाळांची थकीत वीजबिले अदा करण्यात आली आणि रात्री उशिराने सर्व आश्रमशाळांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला.

अपर आयुक्त कार्यालयाच्या सूचना

अपर आयुक्त कार्यालयांतर्गत येणाऱ्या आश्रमशाळा व वसतिगृहांचे वीजबिल, पाणीपट्टी, घरपट्टी थकीत असेल आणि त्यासाठी निधीची गरज असेल, अशा आश्रमशाळा शिक्षकांनी तत्काळ मागणी करावी आणि वीजपुरवठा खंडित होणार नाही, याची काळजी घ्यावी, अशी सूचना अपर आदिवासी आयुक्त कार्यालयाने केल्या आहेत.

नाशिक प्रकल्प कार्यालयांतर्गत ८० शाळा असून, वीजबिलापोटी केवळ तीन आश्रमशाळांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. या आश्रमशाळांचे थकीत वीजबिल अदा केले आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यासंदर्भात संबंधित आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकांकडे विचारणा केली जाणार आहे. -वर्षा मीणा, प्रकल्प अधिकारी, नाशिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोने खरेदी करणाऱ्यांची चिंता वाढली! अवघ्या 6 दिवसांत 50 हजारांनी महाग; आजचा ताजा भाव जाणून घ्या

Uday Samant on NEET Protest : 'नीट आंदोलन विरोधकांनी हायजॅक केलंय'; उदय सामंत यांचा गंभीर आरोप, पेपर फोडणाऱ्यांवर कठोर शिक्षा व्हायलाच हवी

Latest Marathi Update : राहुल गांधींची मोदींवर टीका; 'शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त केली, धर्मेंद्र प्रधानांना हटवा'

Mumbai Girl Stops Police Van : मुंबईच्या पोरी जिगरबाज! पोरांना अटक केलेली पोलीस व्हॅन पोरीनं अडवली; व्हायरल व्हिडिओ

५० ग्राम पावडर खिशात टाकेल, पूर्ण आयुष्य वाया जाईल...; मुंबई पोलिसांकडून आंदोलक विद्यार्थ्यांना थेट धमकी, VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT