Rural Hospital, Wani esakal
नाशिक

Nashik News: गरोदर मातेची वणी ग्रामीण रुग्णालयाकडून हेळसांड; चौकशी करण्यासाठी समिती स्थापन

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : सुरगाणा येथून गरोदर महिलेस प्रसूती वेदना होत असताना, सोनाग्राफी अहवालाचे कारण देत वणी ग्रामीण रुग्णालयातील परिचारीका व डॉक्टरने उपचारासाठी दाखल करून घेतले नाही.

दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात त्या महिलेची सुखरूप प्रसूती झाली. मात्र, हेळसांडीने महिलेच्या जिवीतास धोका व नातवाईकांना मोठा त्रास सहन करावा लागला आहे. याप्रकरणाची जिल्हा शल्यचिकित्सकांनी गंभीर दखल घेत चौकशीसाठी समिती स्थापन केली आहे. (Pregnant mother harassed by Vani Rural Hospital Committee set up to investigate Nashik News)

सुरगाणा येथून ११ ऑक्टोबरला रात्री आठच्या सुमारास मीना थविल (वय २४) या गरोदर महिलेस १०८ रुग्णवाहिकेतून नाशिक जिल्हा रुग्णालयात नेत होते. वणीदरम्यान अतिवेदना होत असल्याने वणी ग्रामीण रुग्णालयात आणले.

मात्र, तेथे उपस्थित वैद्यकीय अधिकारी व परिचारिकेने गरोदर महिलेला न तपासताच पाठवून दिले. महिलेस नाशिकला नेत असताना, असह्य प्रसूती वेदना होऊ लागल्याने तीस दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

तेथे रात्री नऊच्या सुमारास सुखरूप प्रसूती होऊन पुत्ररत्नास जन्म दिला. दरम्यान, गरोदरमातेची झालेली हेळसांड व नातेवाइकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

वणी ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व परिचारिकेच्या बेजबाबदारपणाबाबत रुग्ण व नातेवाइकांनी वैद्यकीय अधीक्षक, जिल्हा शल्यचिकित्सक, निवासी जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे तक्रार केली.

त्यावरून जिल्हा शल्यचिकित्सक डाॕ. अशोक थोरात व वणी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डाॕ. बी. एन. मोरे यांनी याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी चार सदस्यांची समिती गठित केली.

स्त्रीरोग तज्ज्ञ, दोन क्लास वन अधिकारी व एक कर्मचारी अशी समिती सुरगाणा, दिंडोरी व वणी ग्रामीण रुग्णालयाची चौकशी करून अहवाल सादर करणार असल्याची माहिती निवासी वैद्यकीय अधिकारी डाॕ. अनंत पवार यांनी दिली.

अहवालानंतर दोषींवर योग्य ती कारवाई करणार असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Flight Incident: 180 प्रवाशांचा जीव... '9/11' सारख्या हल्ल्याचा धोका; फ्लायदुबईच्या भारतीय कॅप्टनमुळे टळला मोठा अपघात, नेमकं काय घडलं?

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात ठाण्यात तणाव; आदित्य ठाकरे, संजय राऊत कापूरबावडी पोलिस ठाण्यात

Pune Solapur Highway Accident: पुणे-सोलापूर महामार्गावर भरधाव टँकरचा थरार; दुचाकीला धडक देऊन चालक फरार, २१ वर्षीय तरुण ठार

Latest Marathi News Live Update : शेखर गोरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला

IND vs WI 2nd ODI : वेस्ट इंडिजने विक्रमांचा पाऊस पाडला, पण आपला कुलदीप यादव कमी नाही पडला; नोंदवला जबरदस्त पराक्रम...

SCROLL FOR NEXT