फोटो : कुशावर्त तयारी : H33371,72,73,74,75,76,77,78,79,80
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद पाहणी करताना-H33382,83,84,85
राष्ट्रपती कुशावर्तावर १२ मिनिटे, त्र्यंबकेश्वर मंदिरात १५ मिनिटे पूजा
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या मार्गदर्शनात त्र्यंबकेश्वरला रंगीत तालीम
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता.२३ : सिंहस्थ कुंभमेळा ध्वजारोहण सोहळ्यानिमित्ताने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू प्रथमच नाशिक व त्र्यंबकेश्वरला येत असल्याने त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी सुरु आहे. त्र्यंबकेश्वरला शनिवारी (ता.३१) दुपारी दोन वाजता कुशावर्त तीर्थ येथे त्यांच्या हस्ते १२ मिनिटे गोदापूजन होईल. तसेच त्र्यंबकेश्वर मंदिरात १५ मिनिटे पूजाविधी होणार असून पुरोहित संघाचे अध्यक्ष मनोज थेटे हे पौरोहित्य करतील.
राष्ट्रपती मुर्मू यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अमृता फडणवीस, शृंगेरी पिठाचे आद्य शंकराचार्य जगद्गुरू विदुशेखर तीर्थ भारती, अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष, कोषाध्यक्ष, आखाड्यांचे साधु-महंत, नगराध्यक्ष त्रिवेणी तुंगार, नगरसेवक, आमदार व खासदार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा ध्वजारोहण सोहळा होणार आहे. राष्ट्रपती येण्यापूर्वी सिंहस्थ कुंभमेळ्याचे ध्वजपूजन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते सपत्नीक करण्यात येणार आहे. साधारणत:१०० व्यक्तिंची उपस्थिती या सोहळ्यास लाभणार असली तरी त्यांची आसन व्यवस्था करण्यासाठी कुशावर्त तीर्थ अपुर्ण पडते. त्यावर तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी ध्वजस्तंभाजवळील जागा निश्चित केली आहे. मात्र, जागेची अडचण निर्माण होणार असल्याने सर्वांना व्यासपीठावर जागा मिळण्याची शक्यता कमी झाल्याने नगरसेवक थोडे नाराज झाले. मात्र्, जिल्हाधिकारी प्रसाद यांनी त्यांच्यासमोरच जागा निश्चित करून देत या नाराजीवर तोडगा काढला. आखाड्याच्या साधु-महंतांना मुख्यमंत्र्यांच्या व शंकराचार्यांच्या रांगेत बसविले जाणार आहे. आमदार व खासदारांच्या जागाही निश्चित झाली आहे. फक्त नगरपालिकेच्या नगरसेवकांना सपत्नीक उपस्थित राहण्याची संधी मिळणार आहे.
सिंहस्थ पर्वाची सुरुवात या सोहळ्यापासून होत असल्याने संपूर्ण नियोजनासाठी जिल्हाधिकारी प्रसाद यांनी शुक्रवारी दुपारी १ ते सायं. ५ वाजेपर्यंत येथील अधिकाऱ्यांची रंगीत तालीम घेतली. नगराध्यक्षा तुंगार, तहसीलदार गणेश जाधव, मुख्याधिकारी गोविंद जाधव, पुरोहित संघाचे अध्यक्ष मनोज थेटे, नगरपालिका शाखेचे सहायक आयुक्त श्याम गोसावी यांच्यासह सार्वजनिक बांधकाम, वीज वितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
…
सकाळी ९ ते पहाटे ३ वाजेपर्यंत कुशावर्ताचे काम
कुशावर्त तीर्थावरील प्रमुख कार्यक्रमानिमित्ताने येथे सुशोभीकरणासह पाइपलाइन, वीज पुरवठ्याची कामे जोमाने सुरु आहेत. सकाळी ९ ते पहाटे ३ वाजेपर्यंत ही कामे चालू असतात. साधारणतः दीडशे कामगारांचे हात या ठिकाणी अहोरात्र राबत आहेत. ९ लाख लिटरची क्षमता असलेल्या कुशावर्त तीर्थात संत निवृत्तीनाथ समाधी मंदिरासमोरील गंगासागर तलावातून पाणी आणले जाणार आहे.
शुक्रवारी भव्य शोभा यात्रा
सिंहस्थ कुंभमेळा ध्वजारोहण सोहळ्याच्या पूर्वसंध्येला शुक्रवारी (ता. ३०) दुपारी ४ वाजता कुशावर्त तीर्थापासून भव्य शोभा यात्रा निघणार आहे. त्र्यंबकेश्वर मंदिर ते नगरपालिकेच्या कार्यालयापर्यंत ही शोभा यात्रा निघेल. यात आदिवासी समाज बांधवांसह सर्वधर्मीय लोक सहभागी होतील.
कोट
त्र्यंबकेश्वरच्या ग्रामसभेत उपस्थित झालेले विषय मार्गी लावण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहे. नागरिकांना निश्चितपणे दिलासा मिळेल, असा विश्वास वाटतो. ध्वजारोहण सोहळ्यानिमित्ताने कुंभमेळ्यास प्रारंभ होत असल्याने सर्वांनी या सोहळ्यास उपस्थित राहावे.
-त्रिवेणी तुंगार, नगराध्यक्ष, त्र्यंबक नगरपरिषद
साधारणतः ६५ ते ७० वर्षांनंतर येणारा त्रिखंडाचा योग यंदाच्या सिंहस्थ कुंभमेळ्यात येत आहे. तसेच आद्य शंकराचार्य यांच्या हस्ते ध्वजारोहण आणि असून राष्ट्रपतींच्या हस्ते गोदापूजन हे दोन्ही अत्यंत दुर्मिळ योग या सिंहस्थानिमित्ताने जुळून आले आहेत. एक धर्माचे प्रमुख तर दुसरे देशाचे प्रमुख एकाच ठिकाणी येत असल्याने हा अत्यंत अलौकिक सोहळा होणार आहे.
- मनोज थेटे, अध्यक्ष, त्र्यंबकेश्वर पुरोहित संघ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.