नाशिक

शाळा प्रवेशासाठी आता वयाची अट निश्‍चीत

CD
मेन फिचर पान २ --- (प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचे संग्रहित छायाचित्र वापरावे) ------ शीर्षक प्राथमिक शाळा प्रवेशासाठी आता वयाची अट निश्‍चित (उपशीर्षक) नर्सरी ते पहिलीच्या प्रवेशासाठी वयोमर्यादा टप्प्याटप्प्याने लागू; पुढील वर्षापासून नवे नियम सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २२ : पूर्वप्राथमिक आणि इयत्ता पहिलीच्या प्रवेश प्रक्रियेत एकसमानता आणण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने किमान वयाचे निकष निश्चित केले आहेत. पुढील वर्षांपासून म्‍हणजे शैक्षणिक वर्ष २०२७-२८ पासून नर्सरीच्या प्रवेशासाठी नवीन वयोमर्यादा लागू होणार आहे. त्यानंतर ज्युनिअर केजी, सिनिअर केजी आणि इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी टप्प्याटप्प्याने वयाचे निकष लागू केले जातील. शैक्षणिक वर्ष २०३०-३१ पासून इयत्ता पहिलीत प्रवेश घेण्यासाठी बालकाचे वय सहा वर्षे पूर्ण असणे बंधनकारक राहणार आहे. केंद्र सरकारच्या सूचनांनुसार आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी विविध शिक्षण मंडळांच्या शाळांमध्ये प्रवेशासाठी वय मोजण्याच्या तारखांबाबत वेगवेगळे निकष वापरले जात होते. पूर्वप्राथमिक वर्गांच्या प्रवेशासाठीही वयोमर्यादेत एकसमानता नव्हती. त्यामुळे १५ ऑक्टोबरला जारी केलेल्या शासन निर्णयानुसार, प्रवेश प्रक्रिया अधिक सुसंगत करण्यासाठी शासनाने नवीन नियम निश्चित केले आहेत. नव्या निर्णयामुळे राज्यातील शाळांमध्ये प्रवेशासाठी वयाचे निकष एकसमान होण्यास मदत होणार असून, पालक आणि शाळांना प्रवेशाचे नियोजन करताना निश्चित नियमांचा आधार मिळणार आहे. शाळाप्रमुखांना अधिकार पूर्वप्राथमिक ते इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी निर्धारित किमान आणि कमाल वयाच्या मर्यादेत शाळा प्रमुख स्तरावर १५ दिवसांची सूट देण्याची तरतूद आहे. नवीन वयोमर्यादेनुसार प्रवेश प्रक्रिया कशी राबवावी, याबाबत प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून स्वतंत्र सूचना आणि मार्गदर्शक तत्त्वे जारी केली जाणार आहेत. चौकट सध्या शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा प्रत्येक वर्गासाठी ३० जून हा वयाची पात्रता निश्चित करण्याचा संदर्भदिनांक असेल. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये नर्सरी ते इयत्ता पहिलीमध्ये शिकत असलेल्या विद्यमान विद्यार्थ्यांना नवीन वयोमर्यादेचे निकष लागू होणार नाहीत. तसेच मान्यताप्राप्त शाळेत मागील वर्ग उत्तीर्ण केलेल्या नियमित विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश देताना वयाच्या निकषांतून सूट देण्यात आली आहे. त्यामुळे सध्या शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशावर नव्या नियमांचा परिणाम होणार नाही. चौकट प्रवेशासाठी अशी असे वयोमर्यादा नर्सरी : शैक्षणिक वर्ष २०२७-२८ पासून तीन वर्षे पूर्ण. ज्युनिअर केजी : शैक्षणिक वर्ष २०२८-२९ पासून चार वर्षे पूर्ण. सिनिअर केजी : शैक्षणिक वर्ष २०२९-३० पासून पाच वर्षे पूर्ण. इयत्ता पहिली : शैक्षणिक वर्ष २०३०-३१ पासून सहा वर्षे पूर्ण.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्लेनमध्ये बसा अन् चालते व्हा! अमेरिकेचा निरोप घेऊन गेलेल्या पाकच्या लष्करप्रमुखांना इराणने दाखवला बाहेरचा रस्ता

Latest Marathi News Live Update : हुती बंडखोरांचा सौदीतील दम्माम विमानतळावर हल्ला; एका भारतीय नागरिकाचा मृत्यू

Atul Londhe : एकाच क्रमांकावरून २२ हजार मतदारांची नोंदणी; निवडणूक आयोग भाजपासाठी काम करीत असल्याचा आरोप

मेट्रो कामात हलगर्जी, आठ महिन्यांत ७ अपघात; MMRDA सुरक्षा अहवाल सादर करणार

Credit Card Bill: पतीच्या क्रेडिट कार्डवर लाखोंचं कर्ज! मृत्यूनंतर पत्नीला पैसे भरावे लागणार का?

SCROLL FOR NEXT