नाशिक

साक्री शिक्षक मागणी

CD
धुळे : टुडे पान ४ साठी.. -- फोटो क्रमांक : 32358 साक्री : प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या व प्रशासकीय अडचणींसंदर्भात गटशिक्षणाधिकारी कविता मेखे यांना निवेदन देताना प्राथमिक शिक्षक समन्वय समितीचे पदाधिकारी. -- प्राथमिक शिक्षकांच्या प्रशासकीय अडीअडचणी दूर करा -- संघटनांची अधिकाऱ्यांकडे मागणी; प्रलंबित प्रश्नांवर निवेदन देत चर्चा सकाळ वृत्तसेवा साक्री, ता. १४ : तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित समस्या, प्रशासकीय अडचणी आणि शैक्षणिक प्रश्नांबाबत साक्री तालुका शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांना निवेदन देऊन चर्चा करण्यात आली. या बैठकीत शिक्षकांची सेवा पुस्तिका व दुय्यम सेवा पुस्तिका अद्ययावत करणे, आर्थिक वर्ष २०२५/२६ ची पी. एफ. स्लिप, प्रलंबित वैद्यकीय बिले, अर्जित रजा रोखीकरण, वरिष्ठ व निवडश्रेणी, विद्यार्थ्यांचे गणवेश अनुदान, शाळांच्या परवानग्या आणि पेसा क्षेत्रातील शिक्षकांच्या वेतन व फरकासंबंधीच्या प्रशासकीय बाबींवर चर्चा झाली. दररोज मिळणाऱ्या ऑनलाइन कामांमुळे शिक्षकांवर ताण वाढून अध्यापनासाठी वेळ कमी पडत आहे. त्यामुळे अनावश्यक ऑनलाइन कामे कमी करून अध्यापनासाठी वेळ द्यावा, अशी मागणी करण्यात आली. राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाचे राज्य संपर्कप्रमुख राजेंद्र नांद्रे यांनी निपुण महाराष्ट्र ॲपमधील तांत्रिक अडचणी दूर करून शिक्षकांना दिलासा देण्याची मागणी केली. गटशिक्षणाधिकारी कविता मेखे यांनी शिक्षकांच्या अडचणी समजून घेत प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. तसेच, समन्वय समितीची त्रैमासिक बैठक नियमित घेण्याचे मान्य केले. निपुण भारत अभियानांतर्गत वर्गात गुणवत्तापूर्ण काम करून तालुक्याची शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्याचे आवाहन त्यांनी केले. समन्वय समितीचे तालुकाध्यक्ष अनिल तोरवणे यांनी शिक्षक संघटना प्रशासनाला सहकार्य करण्यास कटिबद्ध असून शिक्षकांचे प्रश्न वेळेत सुटावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. धुळे व नंदुरबार जिल्हा प्राथमिक शिक्षक पतपेढीचे गटनेते विनोद पाटील यांनी साक्रीतील शिक्षक संघटना शैक्षणिक कार्यात नेहमीच एकजुटीने अग्रेसर असल्याचे सांगत प्रलंबित प्रश्न तत्काळ सोडविण्याची विनंती केली. या बैठकीस समन्वय समितीचे सचिव सतीश पाटील यांच्यासह तालुक्यातील विविध शिक्षक संघटनांचे तालुकाध्यक्ष, सचिव व पदाधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Israel Flight Crew Ban: पाकिस्तानसह मुस्लिम देशांच्या क्रू मेंबर्सवर बॅन! 'फ्लाईदुबई' घटनेनंतर इस्रायल-फ्रान्सने घेतला मोठा निर्णय

केराटिन ट्रीटमेंटसाठी वारंवार पार्लरमध्ये जाण्याची गरज नाही! घरच्या घरी असा बनवा सोपा हेअर मास्क

W,W,W,W,W ! दक्षिण आफ्रिकन गोलंदाजाचा कहर, ट्वेंटी-२०त एकाच षटकात सलग पाच विकेट्स VIDEO

Pune News : कामकाजात दुर्लक्ष भोवले; आरोग्‍य विभागाच्‍या दोन सहाय्यक संचालकांचे निलंबन

Maharashtra Live News : राहुल गांधी लवकरच महाराष्ट्र दौऱ्यावर; राज्यातील दुष्काळग्रस्त जिल्ह्यांची करणार पाहणी

SCROLL FOR NEXT