नाशिक

माहेजी रेल्वे स्थानकावर ‘रेल जनसंवाद’

CD
माहेजी रेल्वे स्थानकावर ‘रेल जनसंवाद’ स्टेशन प्रबंधक ए. के. शर्मा यांच्यासह मान्यवरांचा सहभाग सकाळ वृत्तसेवा नांद्रा (ता. पाचोरा), ता. २३ : भारतीय रेल्वेच्या स्पेशल कॅम्पेन अंतर्गत माहेजी (ता. पाचोरा) रेल्वे स्थानकावर ‘रेल जनसंवाद’ अभियान राबविण्यात आले. स्टेशन प्रबंधक ए. के. शर्मा यांच्या उपस्थितीत झालेल्या या अभियानात रेल्वे प्रवासी, युवक आणि नागरिकांशी संवाद साधून रेल्वे सेवांबाबत जनजागृती करण्यात आली. ‘रेल की आवाज, युवा की सोच, रेल का समाधान’ या संकल्पनेतून आयोजित या अभियानाचा उद्देश रेल्वे प्रशासन आणि प्रवाशांमधील संवाद वाढविणे, प्रवाशांच्या समस्या व सूचना जाणून घेणे तसेच रेल्वे सेवांमध्ये सुधारणा करण्यासाठी नागरिकांचा सहभाग वाढविणे हा आहे. या उपक्रमात सरपंच सुभाष तावडे, माजी सैनिक जगन्नाथ पाटील, डॉ. एस. पी. पाटील, डॉ. निवृत्ती मराठे, पत्रकार राजेंद्र पाटील, नगराज पाटील, संतोष कुमार, योगेश तिवारी यांच्यासह मान्यवर सहभागी झाले होते. यानिमित्ताने रेल्वे स्थानक परिसर स्वच्छ ठेवणे, प्रवाशांना स्वच्छ व सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देणे आणि रेल्वेच्या विविध सुविधांबाबत जनजागृती करणे, यावर या अभियानातून भर देण्यात आला. रेल्वे स्थानकाचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IMD weather forecast 24 October : २४ ऑक्टोबरला देशातील हवामानात मोठा उलटफेर; गुलाबी थंडी वाढणार की पावसाची एन्ट्री? पाहा हवामानाचा नवा अंदाज!

शिवरायांच्या स्वराज्याची शान! महाराष्ट्रातील ‘या’ 5 किल्ल्यांना एकदा तरी भेट द्याच

Marathi News Live Updates: नाशिकमध्ये कांद्याने भरलेला पिकअप पलटी, दुचाकीस्वार गंभीर जखमी

Global internet security threat : इंटरनेट विश्वात मोठा भूकंप! गुगल, ॲमेझॉनसह OpenAI हाय अलर्टवर; जगभरातील अनेक वेबसाइट्स अचानक का बंद झाल्या?

IND vs NZ T20 : भारतीय संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे इशान किशन दुसऱ्या टी-२० सामन्याला मुकणार

SCROLL FOR NEXT