नाशिक

डॉजबॉल क्रीडा स्पर्धेत

CD
(सूचना : फोटो तीन कॉलम घ्यावा) NSK26H32788 जळगाव : महापालिका डॉजबॉल क्रीडा स्पर्धेत विजयी रायसोनी विद्यालयाच्या संघासोबत मान्यवर. -------- जिल्हा डॉजबॉल स्पर्धेत ‘रायसोनी’ विजयी ---------- संघात मुले-मुलींचाही सहभाग; इंग्लिश मीडियम स्कूल उपविजयी सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता.१८ : येथील जिल्हा क्रीडा कार्यालय, महानगरपालिका, जिल्हा डॉजबॉल असोसिएशन व बी. यू. एन. रायसोनी विद्यालयातर्फे जिल्हास्तरीय शालेय मनपा क्षेत्रीय व ग्रामीण डॉजबॉल स्पर्धेस बी. यू. एन. रायसोनी विद्यालयाच्या क्रिडांगणावर उत्साहात सुरवात झाली. त्यात १७ वयोगटातील मुले-मुलींच्या जिल्हा मनपा डॉजबॉल क्रीडा स्पर्धेत रायसोनी सेमी इंग्लिश मुले व मुलींचा संघ विजयी, तर इंग्लिश मीडियम स्कूल उपविजयी ठरला. या स्पर्धेचे उद् घाटन जिल्हा क्रीडा अधिकारी दिलीप दिघे, राष्ट्रीय अँथलेटिक्स खेळाडू पोलिस उपनिरीक्षक कृष्णा पाटील यांनी केले. नगरसेवक नितीन सपके, महापालिका क्रीडा अधिकारी दिनानाथ भामरे, आंतरराष्ट्रीय डॉजबॉल खेळाडू उमाकांत जाधव, विनायक सपकाळे, महाराष्ट्र डॉजबॉल असोसिएशनचे सचिव राजेश जाधव, रायसोनी स्कूलचे मुख्याध्यापक चंद्रशेखर पाटील, मुख्याध्यापक सचिन महाजन यांची उपस्थिती होती. प्रारंभी खेळाडूंनी क्रीडाज्योत मैदानात आणली. त्यावरून मान्यवरांनी मुख्य क्रीडाज्योत प्रज्वलित केली. मैदानाचे पूजन करून व श्रीफळ वाढवून स्पर्धेचे उद् घाटन करण्यात आले. सूत्रसंचालन जिल्हा महिला क्रीडा शिक्षक महासंघाच्या सचिव डॉ. कांचन विसपुते यांनी केले. जिल्हा डॉजबॉल असोसिएशनचे सचिव योगेश सोनवणे यांनी आभार मानले. आजच्या स्पर्धेचे पारितोषिक बी. यू. एन. रायसोनी विद्यालयाचे मुख्याध्यापक चंद्रशेखर पाटील यांच्या हस्ते विजयी व उपविजयी संघांना देऊन गौरविण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra History: पावणेदोनशे वर्षांपासून दुर्लक्षित समाधीचा शोध! सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षिका सिंथिया फरार यांची कबर सापडली; इतिहासप्रेमींना मोठे यश

RANJI TROPHY: न्यूझीलंड दौऱ्याआधी शुभमन गिलचा रणजीत फ्लॉप शो! १ रनवर बोल्ड करणारा अजय मंडल आहे तरी कोण?

Young Farmer Death: सकाळी चहाचे हॉटेल, दुपारी शेतात काम; २२ वर्षीय संतोष राऊतच्या मृत्यूने सिसारखेडा हळहळले

Latest Marathi News Live Update : दुष्काळामुळे सरकारी खर्चात २० टक्के कपातीचे मुख्यमंत्र्यांचे आदेश; 'लाडकी बहीण' योजनेला मात्र धक्का नाही

Kanya Puja Importance: अष्टमीला कन्या पूजन का केले जाते? जाणून घ्या धार्मिक महत्त्व आणि पूजेची परंपरा

SCROLL FOR NEXT