raj thackeray old statement about shivsena mp sanjay raut ncp sharad-pawar goes viral  
नाशिक

Raj Thackeray on NCP: "राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निवडून येणाऱ्यांची मोळी"; राज ठाकरेंचा शरद पवारांवर घणाघात

मनसेच्या १८ व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात भाषण करताना राज ठाकरेंनी शरद पवारांवर टीका केली.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नाशिक : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर सडकून टीका केली आहे. याद्वारे त्यांनी शरद पवारांवर निशाणा साधला असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा निवडून येणाऱ्यांची मोळी आहे, असा उल्लेख त्यांनी केला. नाशिक इथं आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या १८व्या वर्धापन दिनाचा प्रमुख कार्यक्रम पार पडला. यावेळी राज ठाकरे बोलत होते. (raj thackeray criticizes on ncp and sharad pawar on mns 18th anniversary programme at nashik)

कार्यकर्त्यांनी धीर धरावा

राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना मनसेची आत्तापर्यंतची वाटचाल सांगितली. तसेच कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना धीर धरण्याचा सल्ला दिला. राजकारणात पेशन्स हा खूप महत्वाचा असतो, काही काळानंतर पक्षाला भरभराट येते असं सांगताना त्यांनी भाजप, शिवसेना या पक्षांशी मनसेची तुलना केली. (Latest Marathi News)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निवडून येणाऱ्यांची मोळी

दरम्यान, पक्ष उभा करणं आणि चालवणं सोपं नाही, हे सांगताना ते म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्या आधी दहा वर्षे आला. पण त्याला मी पक्ष म्हणणार नाही. कारण निवडून येणाऱ्या माणसांची ही मोळी आहे. शरद पवार आजपर्यंत हेच करत आले आहेत. जे जे निवडून येतात त्यांना बरोबर घेतात आणि त्याची मोळी बांधतात आणि सांगतात हा माझा पक्ष आहे. ते सध्या वेगळे झाले असले तरी निवडून येणार आहेत. (Marathi Tajya Batmya)

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जनतेला वेडं बनवताहेत

ज्या प्रकारचं राजकारण सध्या महाराष्ट्रात सुरु आहे, कोण कुठे आहे कळतंच नाही. मागं नाट्य संमेलनात मला पाच नगरसेवक भेटायला आले त्यांना मी विचारलं की, तुम्ही कोणत्या गटाचे त्यात तिघेजण शरद पवारांचे तर दोन जन अजितदादांचे होते, पण आले होते एकत्र.

त्यामुळं माझं अजूनही ठाम मत आहे की, ते अजूनही एकच आहेत. तुम्हाला केवळ वेडे बनवत आहेत, त्यांचं आतून सर्व राजकारण सुरु आहे. यात महाराष्ट्राची फक्त माती होत आहे, अशा शब्दांत राज ठाकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवारांवर सडकून टीका केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना चॅलेंज देणारा सुशील केडिया कोण आहे? कसे कमावले कोट्यवधी रुपये?

IND vs ENG 2nd Test: Ohhh NO! शुभमन गिलच्या डोक्यावर चेंडू जोरात आदळला, डॉक्टरांची मैदानावर धाव अन्...

VIRAL VIDEO: यांना 'महाराष्ट्र केसरी' म्हणावं की दुसरं काही! दोन घोरपडीमध्ये रंगली दंगल, व्हिडिओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल

Alternative Careers: 9 ते 5 च्या ठराविक नोकरीला कंटाळला आहात? मग 'हे' 8 करिअर पर्याय तुमच्यासाठी ठरू शकतात योग्य पर्याय!

Viral: पैसे उधार घेणाऱ्यांनो लक्ष द्या...! उसने घेतलेली रक्कम वेळेत परत केली नाही तर होणार जेल अन्..., न्यायालयाचा निर्णय

SCROLL FOR NEXT