raj thackeray, amit thackeray Google
नाशिक

मनसेचं ठरलं! अमित ठाकरेंची यादी, राज ठाकरे करणार शिक्कामोर्तब

विक्रांत मते

नाशिक : महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मनसेकडून (MNS) संघटनात्मक बळकटीवर भर दिला जात असून, मुंबईच्या धर्तीवर शाखाध्यक्ष केंद्रीभूत मानून १२२ प्रभागांमध्ये नियुक्ती केली जाणार आहे. मनसे नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी मंगळवारी (ता.२१) प्रारंभाच्या दौऱ्यात यादी निश्‍चिती केली आहे. बुधवारी (ता.२२) नाशिकमध्ये येणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्याकडून यादीवर शिक्कामोर्तब केले जाणार आहे. शाखाध्यक्षांच्या मेळाव्यात यादी जाहीर करून जबाबदारी सोपविली जाणार आहे.


पुढील वर्षाच्या प्रारंभी महापालिकेच्या निवडणुका होणार आहे. मागील पंचवार्षिकमध्ये सत्तेवर असलेल्या मनसेने पुन्हा एकदा सत्ता संपादनाचा निश्‍चय केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून संघटना बळकटीवर भर दिला आहे. मागील सव्वा चार वर्षे संघटनेकडे ढुंकूनही न पाहिलेल्या राज ठाकरे यांनी दोन महिन्यांपासून नाशिकमध्ये फेऱ्या वाढविताना चिरंजीव अमित यांनादेखील राजकारणाच्या मैदानात उतरविण्यासाठी नाशिकची निवड केली आहे. अमित हेच नाशिकची निवडणूक हाताळणार हे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे. निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी संघटना बळकटीवर भर दिला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुंबईच्या धर्तीवर शाखा अध्यक्षाला महत्त्व येणार आहे. गेल्या महिनाभरापासून संवादाच्या माध्यमातून शाखाध्यक्षांची यादी तयार करण्यात आली आहे. त्यासाठी अमित ठाकरे यांचे मंगळवारी हॉटेल एसएसके येथे आगमन झाले. बुधवारी (ता. २२) पक्षाध्यक्ष राज ठाकरे नाशिकमध्ये येत असून, दोन दिवस ते तळ ठोकून राहतील. अमित ठाकरे यांच्यासमवेत मनसेचे ज्येष्ठ नेते नितीन सरदेसाई, शिरीष सावंत, संदीप देशपांडे, अविनाश जाधव व योगेश परुळेकर आहेत. अमित ठाकरे यांनी १२२ शाखाध्यक्षांची यादी निश्चित केली आहे. राज ठाकरे हे शाखाध्यक्षांच्या अंतिम यादीवर हात फिरवून गुरुवारी (ता. २३) मेळाव्यात नियुक्ती जाहीर करतील.

मनसेत संवादाचे दर्शन

गेल्या काही दिवसांपासून मनसेत अंतर्गत वाद सुरू असून, वरिष्ठ नेत्यांकडून नव्या नेतृत्वाला संधी दिली जात नसल्याची तक्रार आहे. सत्ताधारी भाजप विरोधात आंदोलनासाठी मोठी संधी असताना आंदोलन करू दिले जात नाही. मुंबईतील नेत्यांशी थेट संवाद साधल्यास स्थानिक वरिष्ठांच्या नाराजीला सामोरे जावे लागते अशी तक्रार आहे. त्यातून मनसेत विसंवाद निर्माण झाला असून, राज ठाकरे यांच्या दौऱ्यानिमित्त एकोपा दिसत असला तरी हा वरवरचा संवाद असल्याचे बोलले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Alert: मुंबईत ४.५ मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटा २४ वेळा धडकणार! सर्वात मोठी भरती कधी येणार? मान्सूनसोबत हाय टाइडचाही धोका

Indian Visa Regulations: परदेशी नागरिकांसाठी भारताचे व्हिसा नियम बदलले; एका चुकीमुळे होऊ शकते मोठी कारवाई!

Pune Vidhan Parishad Election: विधान परिषद निवडणुकीतून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची माघार; 'या' कारणामुळे घेतला निर्णय

मच्छिंद्र कांबळी यांचं अजरामर 'वस्त्रहरण' नाटक पुन्हा भेटीला येणार; 'हा' कसलेला अभिनेता साकारणार तात्या सरपंच

Latest Marathi News Live Update : जय प्रकाश गांधी यांना 'भारतमला महामार्ग भूसंपादन नुकसानभरपाई घोटाळा' प्रकरणात अटक

SCROLL FOR NEXT