Actors of Shree Padmatara Social Multi-Purpose Institute performing scenes from the play 'The Conscience' at the State Drama Competition esakal
नाशिक

Rajya Natya Spardha: सत्य अन् कल्पनेचा खेळ ‘द कॉन्शन्स’

प्रतीक जोशी

सत्य अन् कल्पनाविलासित सद्सद्विवेकबुद्धीचा खेळ मांडणारी नाट्यकृती ‘द कॉनशन्स’. ६२ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत गुरुवारी (ता. ३०) श्री पद्मतारा सामाजिक बहुद्देशीय संस्था, नाशिकतर्फे सादर झाले.

अमेय दक्षिणदास लिखित या नाटकाचे विनय कटारे यांनी दिग्दर्शन केले. (Rajya Natya Spardha Game of Truth and Imagination The Conscience nashik)

शक्यतांना जन्म देतात त्या घटना. कधी सत्य असतात, तर कधी कल्पनाविलासित. अशाच रंजक शक्यतांना आपल्या कल्पनाशक्ती अन् प्रतिभेने सरंचित करण्याचा प्रयत्न लेखकाने केला आहे. बुद्धीने निर्णय घेणे टाळले तर सद्सद्विवेकबुद्धी निर्णय घेते.

श्याम, मीरा आणि मनस्वी या तीन पात्रांभोवती नाटकाचे कथानक आकार घेते. तर्क, नियम आणि निर्णय या स्वयंसिद्ध बीजावर आधारित नाटकातील पात्रांचा प्रवास आधारलेला आहे.

हातून घडलेल्या चुकांपासून परावृत्त करणारा अन् घडलेल्या गुन्ह्यांना शिक्षा देणारा ज्याचा त्याचा कॉन्शन्स असतो हे या नाट्यकृतीतून प्रेक्षकांसमोर येते.

सचिन रहाणे, भावना कुलकर्णी, विनय कटारे या कलावंतांनी नाटकात भूमिका साकारल्या. विनोद राठोड यांनी प्रकाशयोजना, तर प्रणिल तिवडे यांनी नाटकाला पार्श्वसंगीत दिले.

दीपक चव्हाण यांनी नाटकाचे नेपथ्य साकारले. माणिक कानडे यांनी रंगभूषा तर भावना कुलकर्णी यांनी वेशभूषा साकारल्या.

आजचे नाटक

मुंबई मॉन्सून

लेखक - महेंद्र तेरेदेसाई

दिग्दर्शक - राजेश टाकेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात २१ वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल, नवव्या मजल्यावरून उडी मारत संपवलं आयुष्य

Pune Crime : मद्याच्या नशेत तरुणीचा विनयभंग करणाऱ्या पोलिस हवालदाराला अटक; हवालदाराला निलंबित करण्याचे दिले आदेश

Bail Pola Water Scarcity : पावसाचा खंड! पोळ्याला बोअरवेलच्या पाण्यावर बैलराजाची खांदेमळणी

Marathi News Live Updates : नागपूर RTO च्या परमिट विभागातील कथित अनियमिततेवरून मनसे आक्रमक

Swimming Competition : १३ वर्षीय विदीची ८१ किमी जलतरणात झेप; देश पातळीवर झालेल्यामुर्शिदाबाद स्पर्धेत द्वितीय क्रमांक

SCROLL FOR NEXT