नाशिक

रामकुंड व गोदा घाटचा चेहरा बदलणार

CD
मेन ------------- रामतीर्थ- गोदाघाट परिसराचा चेहरा बदलणार ९ कोटी २० लाखांत ऐतिहासिक मंदिरांचा जीर्णोद्धार; जुन्या वाड्यांचेही संवर्धन सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २३ : कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या धार्मिक वैभवाला नवा साज चढणार आहे. पंचवटीतील गोदाघाट आणि रामतीर्थ परिसरात असलेल्या शेकडो वर्षे जुन्या मंदिरांचा जीर्णोद्धार करण्याचा मोठा निर्णय महापालिकेच्या स्थायी समितीने घेतला आहे. या कामासाठी तब्बल ९ कोटी २० लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. नाशिकला जागतिक दर्जाचे आध्यात्मिक पर्यटनस्थळ बनवण्यासाठी केंद्र शासनाच्या पर्यटन विकास योजनेतून रामकाल पथ प्रकल्प सुरू आहे. याच प्रकल्पाची व्याप्ती आता वाढवली आहे. सुरुवातीला फक्त काही कामे होती, आता गोदाघाट, रामतीर्थ ते थेट मालेगाव स्टॅन्डपर्यंतच्या सर्व ऐतिहासिक वास्तू यात घेण्यात आल्या आहेत. -- काय कामे होणार ? या प्रकल्पात बालाजी कोट, गाडगे महाराज पूल परिसर, जुने वाडे आणि मंदिरांची दुरुस्ती केली जाणार आहे. मंदिरांच्या भिंती, खांब, छताची डागडुजी, दगडी कामाची जतन- संवर्धन पद्धतीने दुरुस्ती आणि तिथल्या विद्युत व्यवस्थेचे आधुनिकीकरण असे सर्व काम एकत्र होणार आहे. महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने यासाठी ई- निविदा काढली होती. एकूण ५ कंपन्यांनी निविदा भरल्या, त्यातल्या ३ पात्र ठरल्या. त्यामध्ये सवानी हेरिटेज कन्झर्व्हेशन प्रा. लि. या कंपनीने सर्वात कमी दर दिल्याने त्यांनाच हे काम देण्याला मंजुरी मिळाली आहे. ही कंपनी हेरिटेज वास्तूंच्या संवर्धनात तज्ज्ञ मानली जाते. गोदाघाट आणि रामतीर्थ हा नाशिकच्या ओळखीचा आत्मा आहे. कुंभात देश-विदेशातून लाखो भाविक येतात. मंदिरांचे जतन झाल्याने हा ऐतिहासिक वारसा पुढच्या पिढ्यांसाठी सुरक्षित राहणार आहे. शिवाय परिसराचे सौंदर्य वाढल्याने पर्यटकांची संख्या वाढेल आणि स्थानिक व्यवसायालाही चालना मिळेल, अशी अपेक्षा आहे. या निर्णयामुळे रामकाल पथाचे काम आता अधिक वेगाने पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nanded News : नवी दिल्लीतील 'ESTIC 2026' राष्ट्रीय परिषदेसाठी डॉ. विजयकुमार जाधव यांची सलग दुसऱ्यांदा निवड!

BCCI Junior Selection Committee: भारताच्या माजी वेगवान गोलंदाजाकडे मोठी जबाबदारी! परविंदर अवाना बनले BCCI ज्युनियर निवड समितीचे अध्यक्ष

Marathi News Live Updates: नाशिक कुंभमेळ्याआधी ५५० जणांचा सामूहिक शंखनाद; गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होणार

Kojagiri Purnima 2026: यंदा कधी आहे कोजागिरी पौर्णिमेचा मुहूर्त? जाणून घ्या पूजा विधी आणि पौराणिक कथा

IND W vs ZIM W: श्री चरणीची भेदक गोलंदाजी; झिम्बाब्वेचा डाव आटोपला, भारतासमोर किती धावांचं लक्ष्य?

SCROLL FOR NEXT