Atrocity Crime News esakal
नाशिक

Nashik Crime News : लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार; ॲट्रॉसिटीन्वये गुन्हा दाखल

नरेश हाळणोर

नाशिक : प्रेमसंबंधानंतर लग्नाचे आमिष दाखवून संशयिताने तब्बल सात वर्षे पीडितेवर अत्याचार केले. मात्र खालच्या जातीची असल्या कारणाने लग्नास नकार देणाऱ्या संशयितासह तिघांविरोधात बलात्कार व ॲट्रोसिटी अन्वये नाशिकरोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Rape by pretense of marriage case registered under Atrocity Nashik Latest Crime News)

निखिल गुलाब भावसार, मीना भावसार, गुलाब भावसार (सर्व रा. गुरुदर्शन अपार्टमेंटसमोर, मॉडेल कॉलनी, जेलरोड) असे संशयितांची नावे आहेत. पीडित महिलेच्या फिर्यादीनुसार, नोव्हेंबर २०१४ पासून पीडित महिला व संशयित निखिल यांच्या प्रेमसंबंध होते. संशयिताने लग्नाचे आमिष दाखवून मित्राच्या घरी, शिर्डी व त्याच्या राहत्या घरी नेऊन शारीरिक संबंध ठेवले. मात्र नंतर त्याने पीडिता खालच्या जातीची असल्याने लग्नास नकार दिला.

तसेच, पीडितेच्या आईवडीलांनाही त्याने खालच्या जातीच्या असल्यावरून बऱ्याचदा हिनवले. संशयितावर असलेल्या प्रेमामुळे तो लग्न करेल अशी पीडितेला अपेक्षा होती. परंतु संशयिताने नकारच दिल्यामुळे पीडितेने नाशिकरोड पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक आयुक्त धुमाळ हे तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Municipal Corporation Election: एकनाथ शिंदेंच्या निवास्थानी मध्यरात्री मॅरेथॉन बैठक, काय ठरलं? महापालिका निवडणुकीसाठी आजचा दिवस निर्णायक!

Marathi Sahitya Sammelan: ग्रंथदिंडीने राजधानीत साहित्य, संस्कृतीचा जागर; साताऱ्यात ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिमाखात सुरू

अग्रलेख - भूमिकन्यांचा सन्मान

हिवाळ्याची खास चव! घरी बनवा गरमागरम गुळाची पोळी, रेसिपी इतकी सोपी की लगेच नोट कराल

आजचे राशिभविष्य - 02 जानेवारी 2026

SCROLL FOR NEXT