Rape news esakal
नाशिक

Nashik Crime : अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीस 20 वर्षांचा तुरुंगवास

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : अल्पवयीन मुलीचे अपहरण करून अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीला जिल्हा व सत्र न्यायालयाने २० वर्षांचा तुरुंगवास व १३ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

तर, अपहरण केल्याप्रकरणी दुसऱ्या आरोपीस पाच वर्षांचा तुरुंगवास व दोन हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. हरिचंद्र नथू गायकवाड (२३) व विलास पुंडलिक चौधरी (२२, दोघे रा. वरंभे, ता. सुरगाणा), अशी दोघा आरोपींची नावे आहेत. (rape of minor girl 20 years imprisonment for accused Nashik Crime latest marathi news)

सुरगाणा तालुक्यातील बाऱ्हे येथे गेल्या २४ जून २०२० ला सायंकाळी ही घटना घडली होती. पीडितेच्या पालकांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दोघा आरोपींनी १४ वर्षीय मुलीचे अपहरण करून चिकाडी शिवार, दिंडोरी तालुक्यातील जऊळके वणी, निफाड येथील ओझर सोनेवाडी या ठिकाणी नेऊन २४ जून ते ४ जुलै २०२० दरम्यान अत्याचार केला.

तर विलास चौधरी याने पीडितेचे अपहरण करणाऱ्या गायकवाड यास मदत केली होती. दोघांविरुद्ध पॉक्सोसह बलात्कार, अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दोघांनाही अटक करून तपास करीत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी पक्षातर्फे ॲड. दीपशिखा भिडे यांनी युक्तिवाद केला. त्यांनी सात साक्षीदार तपासले. त्यात दोघांविरुद्ध गुन्हा सिद्ध झाल्याने न्यायाधीश डी. डी. देशमुख यांनी गायकवाड व चौधरी दोघांनाही शिक्षा सुनावली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Manhole News: 'तेच घर चालवत होते, आमचा एकमेव आधार गेला...'; मॅनहोलमध्ये पडून असलम शेख यांचा मृत्यू; कुटुंबाचा न्यायासाठी आक्रोश

श्रेयस तळपदेचं घर पाहिलंत का? भलीमोठी बाल्कनी अन् ५० वर्ष जुनी भांडी, पाहा आतले सुंदर फोटो!

Latest Marathi News Live Update : अनंत अंबानी यांनी छतरपूर जिल्ह्यातील बागेश्वर धामला भेट दिली

Aashadhi Wari: आषाढी वारीसाठी आळंदी सज्ज! दोन दिवसांत सर्व प्रलंबित कामे पूर्ण करण्याचे आदेश; वारीपूर्व तयारीला अंतिम वेग

Maharashtra Loan Waiver : जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून खात्यात जमा होणार पैसे; 56 लाख शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमाफी, बँक खात्यांची पडताळणी सुरू

SCROLL FOR NEXT