नाशिक

मेहरुण तलावावर ५१ फुटी रावणाचे दहन

CD
NSK26H33150 जळगाव रावणदहन करताना आमदार सुरेश भोळे. शेजारी उपमहापौर मनोज चौधरी, पीयूष कोल्हे आदी. --- NSK26H33148 रावणदहनाचे दृश्‍य. ---- मेहरुण तलावावर ५१ फुटी रावणाचे दहन एल. के. फाउंडेशनतर्फे आयोजन; मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २० : विजयादशमीनिमित्त मेहरुण तलाव परिसरात एल. के. फाउंडेशनतर्फे ५१ फुटी रावणाच्या प्रतिकृतीचे दहन करण्यात आले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. दुष्काळी परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या आर्थिक मर्यादा असतानाही वर्षानुवर्षे सुरू असलेली परंपरा अखंडित ठेवण्याच्या उद्देशाने यंदाही रावण दहनाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमातून वाईट प्रवृत्तींवर चांगुलपणाचा विजय हा संदेश देण्यात आला. या कार्यक्रमाला आमदार सुरेश (राजूमामा) भोळे, पीयूष कोल्हे, उपमहापौर मनोज चौधरी, नगरसेवक नितीन बरडे, गणेश सोनवणे, प्रवीण कोल्हे, नरेंद्र पाटील यांच्यासह नीलेश तायडे, प्रफुल्ल देवकर आणि सुनील पाटील उपस्थित होते. ॲड. सुनील पाटील यांनी सूत्रसंचालन केले. चौकट परंपरेचे सातत्य कायम मेहरुण तलाव परिसरातील रावण दहन हा जळगावमधील विजयादशमी उत्सवातील महत्त्वाचा उपक्रम मानला जातो. दरवर्षी रावणाची भव्य प्रतिकृती उभारून तिचे दहन केले जाते. यंदाही ५१ फुटी रावणाच्या प्रतिकृतीचे दहन करून एल. के. फाउंडेशनने परंपरेचे सातत्य राखले. दुष्काळी परिस्थिती असतानाही सांस्कृतिक परंपरा जपण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. रावण दहन पाहण्यासाठी नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dasara Melava 2026: संजय राऊतांचा अमित शाहांवर हल्लाबोल; 'लॉरेन्स बिश्नोई अस्तित्वात नाही, अमित शाह हेच लॉरेन्स बिश्नोई'

Eknath Shinde : "शेतकऱ्यांच्या लेकींच्या लग्नाचा सर्व खर्च आमचा"; दसरा मेळाव्यातून एकनाथ शिंदेंची सर्वात मोठी घोषणा!

INDW vs ZIMW 3rd T20I: १० चौकार, ५ षटकार अन् ९१ धावा! हरमनप्रीत कौर रडली, चेहरा लपवताना दिसली; म्हणाली, त्या शब्दांनी...

Latest Marathi News Live Update : जाणून घ्या आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

Dasara Melava : दसरा मेळाव्यात राजकीय रणसंग्राम; मनोज जरांगे आणि रामदास कदम यांच्यातील वाद विकोपास!

SCROLL FOR NEXT