नाशिक

यंदाचा रवींद्र दामले पुरस्कार परिवर्तन संस्थेला जाहीर

CD
यंदाचा रवींद्र दामले पुरस्कार परिवर्तन संस्थेला जाहीर उपशीर्षक शुक्रवारी पुण्यात वितरण सोहळा सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १९ : महाराष्ट्र कल्चरल सेंटर पुणे यांच्यातर्फे दरवर्षी दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘रवींद्र दामले स्मृती पुरस्कार’ यंदा जळगावच्या परिवर्तन संस्थेला जाहीर झाला आहे. येत्या २३ ऑक्टोबरला पुणे येथील श्रीराम लागू रंग-अवकाश येथे होणाऱ्या समारंभात हा पुरस्कार देण्यात येणार आहे. परिवर्तन जळगाव या संस्थेच्या अनेक वर्षांच्या कामाबद्दल हा पुरस्कार देण्यात येणार आहे. गेल्या सोळा वर्षांपासून परिवर्तने सातत्याने विविध नाट्यनिर्मिती, संगीतमय कार्यक्रमाची निर्मिती, नाट्य कार्यशाळा, व्याख्यान, चर्चासत्र, महोत्सव, प्रेक्षक सभासद योजना, यामधून खानदेशी सांस्कृतिक विश्व समृद्ध केले आहे. परिवर्तन निर्मित नाटकांचे व सांगितिक कार्यक्रमांचे प्रयोग आता केवळ महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण देशात व्हायला लागले आहेत. जळगाव शहरातील कलावंतांची निर्मिती आता देशभर जाते आहे. याच कामाची दखल घेत पुणे येथील महाराष्ट्र कल्चर सेंटरने परिवर्तनला हा पुरस्कार जाहीर केला आहे. परिवर्तनच्या या यशाबद्दल परिवर्तनचे मार्गदर्शक अशोक जैन, विजय बाविस्कर, श्रीकांत देशमुख, अनिल पाटकर, यासोबतच परिवर्तनचे प्रमुख अनिल कांकरिया, अनिश शहा, नंदलाल गादिया, किरण बच्छाव, अमर कुकरेजा छबीराज राणे, नारायण बाविस्कर, मंजूषा भिडे, सुदीप्ता सरकार यांनी सर्व सहकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे. ----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : बंटी पाटलांचा महायुतीला दणका! गोकुळ दूध संघ निवडणुकीत समविचारी आघाडीची सत्ता स्थापनेकडे वाटचाल

Petrol Diesel Price: आंतरराष्ट्रीय बाजारात घसरण; भारता पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार का?

त्याने स्वतःच स्वतःचा जीव घेतला... लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या निधनावर भाऊ पुरुषोत्तम बेर्डे यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले- कुणाचंही ऐकलं नाही...

Gokul Election Result 2026 : ब्रेकिंग न्यूज! नविद मुश्रीफ पराभूत; सतेज पाटलांची आघाडी १४ जागांवर आघाडी

Namo Shetkari Yojana Latest Update : दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना दिलासा मिळणार? 5 हजारांची दुष्काळी मदत घोषित, पण नमो शेतकरी योजनेच्या 4 हजारांचे काय?

SCROLL FOR NEXT