नाशिक

विद्यापीठाच्या ग्रंथालयात भव्य ग्रंथप्रदर्शनाचे

CD
शहर टुडे पान चारसाठी NSK26H32558 जळगाव : वाचन प्रेरणा दिनानिमित्त गुरुवारी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात आयोजित ग्रंथप्रदर्शनाची पाहणी करताना कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी, प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे आदी. ---- अभ्यासक्रमाच्या पुस्तकांबरोबर ग्रंथांचेही वाचन करा ----- कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी : विद्यापीठात ग्रंथप्रदर्शनाचे उद् घाटन सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १५ : वाचनामुळे ज्ञानात भर पडण्यासोबतच विचारांना व्यापकता, आकलनशक्ती व व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळते. विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमाच्या पुस्तकांबरोबरच चरित्रे, आत्मचरित्रे, संशोधनपर साहित्य व विविध विषयांवरील ग्रंथांचेही वाचन करावे, असे आवाहन कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांनी विद्यार्थ्यांना केले. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील ज्ञानस्रोत केंद्राच्या वतीने भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन गुरुवारी (ता.१५) साजरा करण्यात आला. यानिमित्त विद्यापीठाच्या ग्रंथालयात भव्य ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. या प्रदर्शनाचे उद् घाटन झाले. याप्रसंगी कुलगुरू प्रा. माहेश्वरी बोलत होते. यावेळी रसायनशास्त्र प्रशाळेचे संचालक प्रा. डॉ. दीपक एस. दलाल अध्‍यक्षस्‍थानी होते. यावेळी प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे, प्रा. डॉ. सुनील कुळकर्णी उपस्थित होते. ‘ग्रंथालय साहित्याच्या माध्यमातून संवाद कौशल्य’ या विषयावर आयोजित व्‍याख्‍यानात हिंदी विभाग प्रमुख प्रा. डॉ. सुनील कुळकर्णी यांनी नियमित वाचनामुळे भाषिक क्षमता, शब्दसंपत्ती, विचारांची स्पष्टता व अभिव्यक्ती कौशल्य विकसित होत असल्याचे सांगितले. ग्रंथालयातील विविध विषयांवरील साहित्याचा उपयोग विद्यार्थ्यांच्या ज्ञानवृद्धीसह व्यक्तिमत्त्व विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरतो, असे त्यांनी नमूद केले. प्रा. दलाल यांनी वाचनामुळे विचारप्रक्रिया समृद्ध होऊन आत्मविश्वासाने संवाद साधण्याची क्षमता विकसित होते, असे सांगितले. प्रारंभी ज्ञानस्रोत केंद्राचे संचालक डॉ. चंद्रशेखर वाणी यांनी प्रास्ताविक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सीजेपीच्या 'तिरंगा मार्च'ला आडकाठी! दिल्लीतील सेंट्रल पार्क बंद ठेवण्याचा निर्णय; अभिजित दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, '100 ठिकाणी...'

Drunk and Driver : कोथरूडमध्ये ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’चा थरार; तीन ते चार जण किरकोळ जखमी, २४ वर्षीय कारचालक विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात

Mangalwedha News : मंगळवेढा तालुक्यात 4777 कुटुंबाचे धान्य ऐन दुष्काळात बंद

Manchar Water Issue : आंबेगाव तालुक्यात दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाईवर तातडीने नियोजन करा; प्रांताधिकारी अर्चना तांबे यांचे अधिकाऱ्यांना आदेश

PM नरेंद्र मोदींना भेटले Asiad पदकविजेते भारतीय खेळाडू, वैभव सूर्यवंशीच्या रिअॅक्शनचा Video होतोय Viral

SCROLL FOR NEXT