NSK26H32648
जळगाव : वाचन प्रेरणा दिनी पुस्तक वाचन करताना विद्यार्थी फाउंडेशनचे अध्यक्ष साहेबराव पाटील, मुख्याध्यापक पी.आर.जाधव आदी.
-----
वाचन प्रेरणा दिनानिमित्त
विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १६ : भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त १५ ऑक्टोबरला साजऱ्या होणाऱ्या वाचन प्रेरणा दिनानिमित्त येथील स्व. दादासो. देवराम खुशाल पाटील फाउंडेशनतर्फे विद्यार्थ्यांना राष्ट्रपुरुष आणि शास्त्रज्ञांच्या जीवनावरील पुस्तकांचे वाटप करण्यात आले.
महाबळ परिसरातील श्रीमती जानकीबाई आनंदरामजी बाहेती हायस्कूल आणि शकुंतला गोपीनाथ राणे प्राथमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना ही पुस्तके भेट देण्यात आली. काही विद्यार्थ्यांनी मिळालेल्या पुस्तकांचे वाचनही केले.
बाहेती हायस्कूलमध्ये झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक पी. आर. जाधव होते. फाउंडेशनचे अध्यक्ष अभियंता साहेबराव पाटील प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. ‘अनाथांची आई’ या सिंधूताई सपकाळ यांच्या चरित्राचे लेखक आणि सिंधूताईंचे मानसपुत्र डी. बी. महाजन यांचीही उपस्थिती होती.
अभियंता पाटील यांनी विद्यार्थ्यांना वाचन प्रेरणा दिनाचे महत्त्व सांगितले. डॉ. कलाम यांच्या कार्याची माहिती देत नियमित वाचन करण्याचे तसेच मिळालेली पुस्तके एकमेकांना देऊन वाचनाची सवय जोपासण्याचे आवाहन केले. मुख्याध्यापक जाधव यांनीही मनोगत व्यक्त केले. के. एच. पाटील यांनी सूत्रसंचालन केले, तर सुनीता महाजन यांनी आभार मानले. अनिता महाजन, चैताली पाटील आणि जितेंद्र ठाकूर उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.