Relatives beat Doctor after child dies during treatment esakal
नाशिक

नाशिक : उपचार सुरू असताना बालक दगावल्याने डॉक्टरांना मारहाण

सतिश निकुंभ

सातपूर (जि. नाशिक) : परिसरातील सार्थक हॉस्पिटलमध्ये रविवारी (ता.२२) रात्री बालकाला दाखल करण्यात आले. परंतु, वैद्यकीय उपचार सुरू असतानाच बालक दगावल्याने रुग्णाच्या नातेवाइकांनी रात्रपाळीत कार्यरत वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना मारहाण करत हॉस्पिटलची तोडफोड केली.

डॉक्टरांमधे भितीचे वातावरण

सध्या सातपूर, सिडको परिसरात मोठ्या प्रमाणावर डेंगी, चिकूनगुनिया, थंडी व तापाचे रुग्ण वाढले आहेत. त्यात दोन दिवसांपासून श्रमिकनगर आदी भागात कोरोना रुग्णही आढळत आहेत, अशा परिस्थितीत रविवारी रात्री सिडको परिसरातून एका बालकाला सातपूर येथील सार्थक हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी लगेचच उपचारही सुरू केले. तसेच लहान मुलांच्या स्पेशालिस्ट डॉक्टरांनाही पाचारण केले. हे सर्व प्रयत्न असफल झाले आणि वैद्यकीय उपचार सुरू असतानाच ते बाळ दगावले. यामुळे नातेवाइकांचा संताप अनावर झाला. त्यांनी लगेचच संबंधित डॉक्टरांना मारहाण केली व हॉस्पिटलमध्ये तोडफोड केली. ही बाब पोलिसांना समजताच सातपूर पोलिस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले व संबंधितांना ताब्यात घेतले. सध्या तिसऱ्या कोरोना लाटेचे संकेत मिळत आहेत. यात लहान मुलांना अधिक धोका असल्याचे बोलले जात आहे. उपचारादरम्यान नको ते घडले, तर हॉस्पिटल, डॉक्टर व कर्मचाऱ्यांना मारहाण करण्याच्या प्रकारात वाढ होण्याची भीतीही व्यक्त होत आहे. या बाबत प्रशासनाने योग्य नियोजन करावे, अशी मागणी सातपूरमधील डॉक्टरांकडून होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Protest: पेपर लीकविरोधात 'कॉकरोच जनता पार्टी'चा एल्गार! आंदोलनासाठी परवानगी कशी मिळते? जाणून घ्या प्रक्रिया

Diesel Selling : कॅनमध्ये डिझेल विक्रीला बंदी; व्यावसायिकांसह वाहनचालकांची गैरसोय

Bhor News : माजी मंत्री अनंतराव थोपटे यांचे निधन

Hero HF Deluxe : पेट्रोलची चिंता संपणार? नितीन गडकरींची मोठी भेट; भारतात पहिल्या Flex Fuel बाईकची एन्ट्री, किंमत 72 हजारपासून सुरू

Kolhapur Accident: कोल्हापुरात भीषण अपघात! एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT