passport esakal
नाशिक

Nashik News: शहानिशा अन पडताळणीनंतर पारपत्र कार्यालयास अहवाल; संघटित टोळ्यांमुळे गृह विभाग सतर्क

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : परदेशी नागरिकांना बेकायदेशीर भारतीय पारपत्र, आधारकार्ड, पॅनकार्ड तयार करण्यासाठी संघटित टोळ्या कार्यरत असल्याचे केंद्रीय सुरक्षा यंत्रणेने लक्षात आणून दिले. याच पार्श्‍वभूमीवर राज्याचा गृह विभाग सतर्क झाला आहे.

भारतीय पारपत्रासाठी पोलिस पडताळणी करताना अर्जदाराचा पत्ता, गुन्हेगारी पूर्व इतिहास, ओळखपत्र, वास्तव्य आणि इतर बाबींची योग्य तपासणी केल्यावर शहानिशा करावी आणि पडताळणीनंतर पारपत्र कार्यालयाला अहवाल द्यावा, असे फर्मान गृह विभागाने सोडले आहे. (Report to Parpat Office after verification Home department on alert due to organized gangs Nashik News)

उत्तर-पूर्व राज्यातील ओळख, पत्त्यांचा वापर करण्याची कार्यपद्धती संघटित टोळ्यांकडून वापरण्यात येते. त्यानंतर परदेशी नागरिकांकडून तत्काळ पोलिस पडताळणीशिवाय भारतीय पारपत्रासाठी अर्ज दाखल करण्यात येत आहे.

पोलिस पडताळणी प्रक्रिया स्थानिक प्राधिकरणावर प्रभाव पाडून करण्यात येते. टोळ्या बेकायदेशीर स्थलांतरितांना आणि इतर देश विघातक घटकांना बेकायदेशीर आधारकार्ड तयार करून पुरवत असल्याचा संशय आहे.

त्यामुळे अंतर्गत सुरक्षेवर गंभीर परिणाम होत असल्याचे केंद्रीय गृह मंत्रालयाने निदर्शनास आणले. त्यामुळे राज्याच्या गृह विभागाने उपाययोजनांचा निर्णय घेतला. आवश्‍यकता असल्यास अर्जदारांच्या निवासस्थानी प्रत्यक्ष भेट द्यावी.

त्यातून बेकायदेशीर स्थलांतरित परदेशी व्यक्ती अथवा देश विघातक घटकांना भारतीय पारपत्र मिळणार नाही. गैरकृत्यास आळा घालण्यासाठी कडक कारवाई करावी, असेही राज्याच्या गृह विभागाने स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidarbha Weather Update: विदर्भात वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट; राज्यभर हवामानाचा बदलता अंदाज, ११ जिल्ह्यांना हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा

Chuda Matar Recipe: सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट अन् हेल्दी मेन्यू! कमी वेळात बनणाऱ्या 'बनारसी पोह्या'ची पाहा सोपी रेसिपी

मनोज जरांगे पाटलांनी मध्यरात्री उपोषण सोडलं, सरकारने मागण्या केल्या मान्य; विखे-पाटील म्हणाले, चर्चा यशस्वी

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

IPL 2026 फायनलच्या २४ तासांपूर्वीच गुजरात टायटन्स संघ अडचणीत सापडला! अहमदाबादला पोहोचण्यास उशीर होणार; चिंता वाढली

SCROLL FOR NEXT