नाशिक

नाशिक जिल्ह्यातील धरणांमधील साठ्यात एक टक्क्याने वाढ

महेंद्र महाजन :सकाळ वृत्तसेवा

धरणांमध्ये ६४ टक्के साठा झाला आहे.

नाशिक: जिल्ह्यातील मोठ्या सात आणि मध्यम १७ अशा एकूण २४ धरणांमधील साठ्यात एका दिवसात एक टक्क्याने भर पडली. धरणांमध्ये ६४ टक्के साठा झाला आहे. गेल्या वर्षी ७३ टक्के साठा झाला होता. दारणामधून १५०, भावलीतून ७३, वालदेवीमधून १८३, नांदूरमध्यमेश्‍वरमधून ८०७, तर हरणबारीमधून ५२३ क्यूसेक विसर्ग सुरू आहे. आतापर्यंत ४० टक्क्यांच्या आत दोन तालुक्यांत पाऊस झाला आहे.

नाशिक तालुक्यात ३९.८४, तर चांदवडमध्ये ३२.८६ टक्के पाऊस झाला आहे. इतर तालुक्यांतील पावसाची टक्केवारी अशी : इगतपुरी- ७५.७७, दिंडोरी- ५१.२४, पेठ- ७३.६१, त्र्यंबकेश्‍वर- ५९.०५, मालेगाव- ७२.५५, नांदगाव- ७४.२९, कळवण- ५४.७२, बागलाण- ६४.७३, सुरगाणा- ७५.४६, देवळा- ७५.०४, निफाड- ७७.३०, सिन्नर- ४६.५२, येवला- ६६.०५.

पाच धरणे तुडुंब

आळंदी, भावली, वालदेवी, हरणबारी, माणिकपुंज ही धरणे शंभर टक्के भरली आहेत. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात ९० टक्के साठा झाला आहे. कश्‍यपीमध्ये ६३, गौतमी गोदावरीमध्ये ७२, पालखेडमध्ये ७६, वाघाडमध्ये ७०, दारणामध्ये ८९, कडवामध्ये ९२, नांदूरमध्यमेश्‍वरमध्ये ९६, चणकापूरमध्ये ७८, केळझरमध्ये ८२, पुनंदमध्ये ८३ टक्के साठा झाला आहे.

कमी साठ्याची धरणे (आकडेवाडी टक्क्यात)

- करंजवण- ३८

- ओझरखेड- ३१

- पुणेगाव- ४६

- तिसगाव- ११

- मुकणे- ५८

- भोजापूर- २१

- नाग्यासाक्या- ११

- गिरणा- ४५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT