नाशिक

रिंगरोडमधील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करावी

CD
रिंग रोडमधील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा प्रशासनाला निवेदन; शेतकऱ्यांचा ‘एमएसआयडीसी’समोर ठिय्या सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १९ : बहुचर्चित रिंग रोड अलाईन्टमेंन्टमधील कथित भ्रष्टाचारच्या चौकशीसाठी बाधित शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या शेतकऱ्यांनी सोमवारी (ता. १९) राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ (एमएसआयडीसी) कार्यालयापुढे ठिय्या आंदोलन केले. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत यांना निवेदन देताना सरकारच्या आदेशाचे पालन न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात आली. रिंग रोडप्रश्‍नी छावा क्रांतिवीर सेनेच्या माध्यमातून दिलेल्या निवेदनात प्रकल्पाच्या अलाइनमेंटमध्ये कथित अनियमितता, शेतकऱ्यांमध्ये जाणीवपूर्वक वाद निर्माण केला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. बाधित शेतकऱ्यांनी तत्पूर्वी ‘एमएसआयडीसी’चे कार्यकारी अभियंता कोळी आणि संदीप पडंगळे यांना जाब विचारताना शेतकऱ्यांच्या घरे व जमिनींवरून रस्त्याची अलाइनमेंट का आखली? तसेच मुख्यमंत्र्यांनी फेरसर्वेक्षणाचे आदेश देऊनही प्रत्यक्षात कार्यवाही केली जात नाही, असा प्रश्‍न केला. या वेळी अलाइनमेंटमधील त्रुटींवर संबंधित अधिकाऱ्यांनी चुका झाल्याचे मान्य केल्याचा दावा आंदोलकांनी केला. बाधित शेतकऱ्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी राजपूत यांच्यापुढे मागण्या मांडल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री गिरीश महाजन यांनी शेतकऱ्यांना न्याय देण्याची सकारात्मक भूमिका घेतली असताना प्रशासकीय स्तरावर टाळाटाळ का केली जाते, असा परखड सवाल केला. तसेच सरकारच्या आदेशांचे पालन न करणाऱ्या अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित करून त्यांची सखोल चौकशी करावी, अशी आग्रही मागणी करण्यात आली. छावा क्रांतिवीर सेनेचे अध्यक्ष करण गायकर यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या आंदोलनाप्रसंगी प्रवीण पाटील, दीपक हगवणे, सुदर्शन पाटील, रवी पेखळे, सागर लोणे, वैभव दळवी यांच्यासह पंधराही गावांतील महिला व शेतकरी बांधव उपस्थित होते. प्रमुख मागण्या - निवाडे प्रलंबित गावांमध्ये फेरमूल्यांकन करावे - उच्चतम खरेदीदरांचा विचार करण्यात यावा - बागायती जमिनींना नियमानुसार योग्य गुणांक द्यावा - बागायतीसाठी गुणांकानुसार मोबदला निश्चित करावा फोटो क्रमांक : एच-33056

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP च्या नेत्यांच्या अडचणीत वाढ; जंतरमंतर आंदोलन प्रकरणी आशुतोष रांका आणि सौरव दास यांना न्यायालयीन धक्का!

Tiger Shroff Firing Case : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणातील आरोपींना पकडणाऱ्या कोण आहेत आयपीएस तेजस्विनी गौतम?

Rain Update : दक्षिण भारतात मुसळधार पावसाचा हाय अलर्ट! तर महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी!

Bishnoi Gang Update : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणानंतर मोठी खळबळ; लॉरेन्स बिश्नोई गँगच्या निशाण्यावर होते 'हे' काँग्रेसचे माजी आमदार!

Latest Marathi News Live Update : महायुतीला धक्का! फेरमतमोजणीची मागणी फेटाळली, सतेज पाटलांच्या समविचारी १३ तर महायुतीला १२ जागा

SCROLL FOR NEXT