Nashik Marathi News esakal
नाशिक

दुचाकीस्वारांनो नाशिकमध्ये पावसात वाहन चालवताना सर्व्हिस रोड वापरा अन्यथा...

ऑईलमिश्रित पावसाचे पाणी रस्त्यावर पसरते आणि त्यावरून दुचाक्या घसरण्याचे प्रकार वाढले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : शहराच्या मध्यवस्तीतून गेलेल्या मुंबई-आग्रा महामार्गावरून अवजड वाहने धावतात. पावसाळ्यात उड्डाणपुलावरील पाणी खाली असलेल्या शहरांतर्गत वाहतुकीसाठीच्या रस्त्यावर पडते. ऑईलमिश्रित पावसाचे पाणी खालच्या रस्त्यावर पसरते आणि त्यावरून दुचाक्या घसरण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यातून गंभीर स्वरुपाचा अपघात होण्याचीही शक्यता असल्याने, पाऊस सुरू असताना दुचाकीस्वारांनी महामार्गालगतच्या सर्व्हिस रोडचा वापर करावा, असे आवाहन नाशिक शहर वाहतूक पोलिसांनी केले आहे. त्यासाठी ठिकठिकाणी सूचना फलकही लावण्यात आलेले आहेत. दरम्यान, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडून या मार्गावरील पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी आणि निसरडा रस्त्यावर खाचा पाडून वाहनांच्या सुरक्षिततेसाठीच्या उपाययोजनाही केल्या जात आहेत. (Latest Marathi News)

शहराच्या मध्यवस्तीतून मुंबई-आग्रा महामार्ग गेलेला आहे. या महामार्गावरील अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे अपघात व वाहतूक कोंडीचे प्रकार नित्याचे होते. त्यामुळे या मार्गावर उड्डाणपुल उभारण्यात येऊन शहरांतर्गत वाहतुकीसाठी उड्डाणपुलाखाली दुतर्फा दोन पदरी रस्त्या आहे. या रस्त्यालगत लहान वाहनांसाठी सर्व्हिस रोडही आहे. उन्हाळ्यात उडडाणपुलाखालून प्रवास करणे लहान वाहनांसाठी उन्हापासून बचावासाठी फायद्याचे ठरते परंतु, याउलट पावसाळ्यात होते.

पावसाळ्यात उड्डाणपुलावरून अवजड वाहने धावत असताना, माती व ऑईल मिश्रित पावसाचे पाणी उड्डाणपुलावरून खालील रस्त्यावर पडते. उड्डाणपुलावरील पावसाने पाणी वाहून जाण्यासाठी पाईपाची व्यवस्था केलेली आहे. मात्र पाईपाच्या नादुरुस्तीमुळे हे पाणी उड्डाणपुलावरून खाली रस्त्यावर पडते. परिणामी हे माती मिश्रित पाण्यामुळे उड्डाणपुलाखालील रस्ते निसरडे आणि धोकादायक झालेले आहेत. याच पाण्यावरून दुचाक्या घसरून अपघात होत आहेत. या अपघातातून गंभीर स्वरुपाची दुखापती दुचाकीवरील चालकांना होतो आहे. तर गंभीरस्वरुपाची घटनाही घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नाशिक शहर पोलीस वाहतूक शाखेकडून महामार्गावर ठिकठिकाणी दुचाकीस्वारांसाठी सूचना फलक लावण्यात आले असून, त्याद्वारे दुचाकीस्वारांनी पाऊस सुरू असल्यास सर्व्हिस रोडचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे.

न्हाईकडून (NHAI) उपाययोजना

राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरण विभागाकडून उड्डाणपुलाखालील रस्त्यावरील धोकादायक निसरडा भागाची पाहणी करण्यात आली. तसेच ठिकठिकाणी मातीमिश्रित पाणी वाहून जाण्यासाठी जेसीबीच्या सहाय्याने खाचा पाडण्यात आल्या. या खाचामुळे वाहनांच्या चाकांना घसरण्यापासून बचाव व टायरला ग्रीप (पकड) मिळण्यास मदत होऊ शकेल. यामुळे दुचाक्या घसरण नाही, यासाठीच्या उपाययोजना करण्यात येत आहेत.

''उड्डाणपुलावरील पावसाचे पाणी खालच्या रस्त्यावर पडल्याने मातीमिश्रित पाण्यामुळे रस्ता निसरडा झाला आहे. विशेषत: दुचाकीचालकांनी पाऊस सुरू असेल तर कृपया सर्व्हिसरोडचा वापर करावा.'' - दिनकर कदम, पोलीस निरीक्षक, शहर वाहतूक शाखा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT