नाशिक

जबरीलुटीतील दोनवर्षापासुन फरारींना अटक

CD
NSK26H33269 जळगाव : जबरीलुटीच्या गुन्ह्यात दोन वर्षांपासून फरार संशयिताना अटक करणारे पथक. लुटीच्या गुन्ह्यात दोन वर्षांपासून फरारींना अटक सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २२ : धरणगाव पोलिस ठाणेंतर्गत जबरी चोरीच्या गुन्ह्यात मागील दोन वर्षांपासून फरार दोन संशयितांना गुन्हेशाखेच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे अटक केली आहे. जिल्ह्यातील फरारी आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करण्याच्या उद्देशाने पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी विशेष मोहीम राबविण्याचे आदेश दिले होते. या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात येऊन शोध सुरू होता. धरणगाव पोलिस ठाणे अंतर्गत दाखल जबरी लूटच्या गुन्ह्यात दोनवर्षांपासून फरारी संशयितांची गुप्त माहिती मिळाली होती. धुळ्यातून केली अटक त्यानुसार गुन्हशाखेच्या पथकातील उपनिरीक्षक संतोष पवार, हरिलाल पाटील, नीलेश सोनवणे, राहुल कोळी, विलास गायकवाड व महेश सोमवंशी यांच्या पथकाने प्राप्त गुप्त माहितीचा शोध घेत संशयित अजय भाईदास थोरात (वय २७ वर्षे, रा. नवलनगर, ता. जि. धुळे). संभाजी बाळू पाटील (वय २६ वर्षे, रा. सातरने, ता. जि. धुळे) अशा दोघांना धुळ्यातून बेड्या ठोकल्या आहेत. अटकेतील संशयिताना धरणगाव पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: ''माझ्याकडेही एक क्लिप आहे.. पिंपरी चिंचवड...'', अजय बारस्कर यांच्याकडून जरांगे पाटलांच्या चारित्र्यावर संशय

Naming Controversy: ट्रम्प यांची सटकली! आता म्हणताहेत 'अटलांटिक महासागरालाच माझे नाव द्या!'

ABHISHEK SHARMA : पहिल्याच बॉलवर सिक्स मारताच अभिषेक शर्माच्या नावावर मोठा विक्रम; शफिकुल्लाहचा रेकॉर्ड मोडला, सूर्या कितव्या नंबरवर?

'माझ्यावर होणाऱ्या मीम्सवर मीही हसतो'; सचिन पिळगांवकर ट्रोलिंगवर पहिल्यांदाच बोलले, म्हणाले...'ही माझी पोरं'

Latest Marathi News Live Update : पुढची ३० वर्षे तरी तुमचा नंबर लागणार नाही...! अमित शाह यांचा राहुल गांधीवर निशाणा

SCROLL FOR NEXT