फोटो : H33389, H33390
आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत
रोहित, सुमीतला सुवर्णपदक
नाशिक, ता. २३ : महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत आंतरमहाविद्यालयीन कुस्ती, वजन उचलणे व शरीरसौष्ठव क्रिडा स्पर्धा २०२६-२७ चे आयोजन सद्गुरू कृषी महाविद्यालय, मिरजगाव येथे करण्यात आले होते. स्पर्धेत के. के. वाघ कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या दोन विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक पटकावले.
यामध्ये द्वितीय वर्षाचा विद्यार्थी रोहित चव्हाणने शरीर सौष्ठव स्पर्धेत ७५ किलो वजनगटामध्ये सुवर्णपदक पटकाविले. तसेच प्रथम वर्षातील विद्यार्थी सुमीत पवार याने वेटलिफ्टिंग स्पर्धेत ११० किलो वजनगटामध्ये सुवर्णपदक पटकाविले. या स्पर्धेत १० जिल्ह्यांतील १५ शासकीय कृषी व ६५ हून अधिक विनाअनुदानित कृषी व कृषी संलग्न महाविद्यालयांमधून सुमारे ३०० खेळाडू सहभाग नोंदविला होता. रोहित चव्हाण व सुमीत पवार यांच्या यशाबद्दल महाविद्यालयातील प्राचार्य, शिक्षक व विद्यार्थ्यांकडून अभिनंदन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या या कामगिरीमुळे महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. या खेळाडूंना क्रीडा शिक्षक सुनील निरगुडे यांनी मार्गदर्शन केले. संस्थेचे अध्यक्ष समीर बाळासाहेब वाघ, विश्वस्त शकुंतलाताई वाघ, सचिव प्रा. के. एस. बंदी, संचालक जनसंपर्क अजिंक्य बाळासाहेब वाघ, समन्वयक डॉ. व्ही. एम. सेवलीकर, प्राचार्य डॉ. एच. व्ही. देशमुख यांनी अभिनंदन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.