नाशिक

रोटरी महावाचन अभियानाला वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

CD
NSK26H32639 जळगाव : रोटरी महावाचन अभियान उद्गाटनप्रसंगी बोलताना डॉ. राजेश पाटील. शेजारी अनिल कांकरिया, डॉ. प्रदीप जोशी, ॲड. सुशील अत्रे, सी.ए. अनिलकुमार शाह आदी. ––– रोटरी महावाचन अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १६ : व. वा. जिल्हा वाचनालय आणि रोटरी क्लब जळगाव यांच्या संयुक्त विद्यामाने वाचन प्रेरणा दिनानिमित्त आयोजित रोटरी महावाचन अभियानाला वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. रोटरीचे प्रांतपाल डॉ. राजेश पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी सहप्रांतपाल अनिल कांकरिया, वाचनालयाचे अध्यक्ष डॉ. प्रदीप जोशी, उपाध्यक्ष ॲड. सुशील अत्रे, कार्याध्यक्ष सी.ए. अनिलकुमार शाह, रोटरी क्लब जळगावचे अध्यक्ष हेमंत भंगाळे, मानद सचिव स्वाती ढाके, प्रोजेक्ट चेअरमन गिरीश कुलकर्णी, ५६ वर्षापासून वाचनालयाचे सभासद असलेले सुरेश महाबळ या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी डॉ. राजेश पाटील यांनी रोटरी महावाचन अभियान हा चांगला उपक्रम असून वाचनालयाची गिफ्ट कार्ड ही अभिनव संकल्पना असून रोटरी जळगाव परिवारातील सर्व क्लबला या विषयी प्रोत्साहित करण्याचे त्यांनी आश्वासन दिले. कार्यक्रमात सुरेश महाबळ यांच्यासह वाचनालयाचे प्रदीर्घ काळापासून सभासद असलेले रामसिंग पाटील, बाळू गावंडे यांच्यासह तीस वर्षांपेक्षा अधिक काळ सभासद असलेले अनिल जगताप, वसंत शिंदे, भास्कर महाजन, कृष्णा वीरकर, नितीन बापट यांना त्यांच्या घरातील युवा पिढीसाठी गिफ्ट कार्ड मान्यवरांच्या हस्ते भेट देऊन सन्मानित करण्यात आले. अनिलकुमार शाह यांनी प्रास्ताविक केले. डॉ. अपर्णा भट - कासार यांनी सूत्रसंचालन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND W vs ZIM W: नव्या पर्वाची सुरुवात पण स्मृती मंधाना आणि झिम्बाब्वेच्या खेळाडू हाताला काळी पट्टी बांधून मैदानावर का उतरले? नेमकं काय घडलं?"

Raju Shetty : केंद्र सरकारचे नाक दाबण्यासाठी साखर उत्पादन बंद करा; राजू शेट्टी यांचे आवाहन

Elon Musk: ''मी कोणत्याही गोऱ्या व्यक्तीला देशाच्या निर्णयात हस्तक्षेप करू देणार नाही''; इलॉन मस्क वादावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले?

Delhi Protest High Drama : 'तिरंगा मार्च' सुरू होण्यापूर्वी अवघ्या १० मिनिटे आधी मोठी कारवाई! सीजेपी प्रमुख अभिजीत दिपकेंना दिल्ली पोलिसांकडून पुन्हा ताब्यात

Marathi News Live Updates: शहरात १०% पाणीकपात, तरीही टँकरने धुतले BRT चे डिव्हायडर; नागरिकांमधून संताप

SCROLL FOR NEXT